अखिल भारतीय हॉकी : ‘मुंबई स्कूल’ संघाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:23 AM2018-10-03T02:23:12+5:302018-10-03T02:23:41+5:30

अखिल भारतीय हॉकी : १६ वर्षे मुलांच्या स्पर्धेत शहीद बिषण सिंग स्कूलवर ४-३ ने मात

All India Hockey: The victory of the 'Mumbai School' team | अखिल भारतीय हॉकी : ‘मुंबई स्कूल’ संघाचा विजय

अखिल भारतीय हॉकी : ‘मुंबई स्कूल’ संघाचा विजय

Next

पुणे : तिसऱ्या १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत एसएनबीपी अकादमी संघाने मंगळवारी झालेल्या लढतीत मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन संघाने गतवर्षीच्या उपविजेत्या शहीद बिषण सिंग स्कूल संघावर ४-३ असा रोमांचक विजय मिळविला. क गटात शहीद बिषण सिंग स्कूलविरूद्धच्या लढतीत मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमसीसीए) संघ पूर्वार्धात १-२ असा माघारला होता. त्यानंतर या संघाने जोरदार मुसंडी मारत सामना जिंकला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अ‍ॅस्ट्रो टर्फ मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.

एमसीसीएकडून धर्मेंद्र पाल व हृतिक गुप्ता यांनी प्रत्येकी एकेक आणि झैद खान याने दोन गोल केले. शहीद बिषण सिंग स्कूलकडून संता सिंग, लवजीत सिंग व मोहीत यांनी एकेक गोल केले. ड गटाच्या सामन्यात धैर्यशील जाधव याने केलेल्या पाच गोलांच्या जोरावर क्रिडा प्रबोधिनी संघाने पश्चिम बंगालच्या बेलाकुलाई सीकेएसी संघाचा ८-० असा सहज पराभव केला. हॉकी सिंदेवाही संघाने यश अ‍ॅकॅडमी संघाचा ९-० असा सहज पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून पवन नानेत याने एक, रौनक चौधरी आणि अल्ताफ खान यांनी प्रत्येकी दोन तर, महोम्मद अर्सलान कुरेशी याने तीन गोल केले.

निकाल :
मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन (एमसीसीए) : ४ (झैद खान २, धर्मेंद्र पाल १, हृतिक गुप्ता १) वि. वि. शहीद बिषण सिंग स्कूल : ३ (संता सिंग १, लवजीत सिंग १, मोहीत १); हाफ टाईम: १-२;
हॉकी सिंदेवाही : ९ (महोम्मद अर्सलान कुरेशी ४, अल्ताफ खान २, रौनक चौधरी २, पवन नानेत १) वि.वि. यश अकादमी : ०.
सॅल्युट हॉकी अकादमी, मोहाली : ५ (राहूल ३, नितीन १, भानू प्रताप सिंग १) वि. वि. विवेकानंद स्कूल, जयपूर : ३ (रजत ३).
क्रीडा प्रबोधिनी : ८ (धैर्यशील जाधव ५, आदित्य लालगे ३) वि. वि. बेलाकुलाई सीकेएसी संघ, पश्चिम बंगाल : ०.
हॉकी नाशिक : ३ (मयुर अहिरे २, कार्तिक लोखंडे १) वि.वि. प्रतापनगर अकादमी : १ (रावी जोशी).
 

Web Title: All India Hockey: The victory of the 'Mumbai School' team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.