After the Kabaddi player arbitrarily by the state organization | राज्य संघटनेच्या मनमानीने कबड्डी खेळाडू बाद

पुणे : इंचिओन आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कबड्डी संघातील किशोरी शिंदेला फेडरेशन करंडक स्पर्धेचे अंतिम निवडीचे पत्र देऊन सुध्दा संघातून बाहेर ठेवण्यात आल्यामुळे राज्य संघटनेचा मनमानी कारभार आणि संघटनेत शिजत असलेल्या राजकारणामुळे कबड्डी क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुंबई येथे शुक्रवारपासून वरिष्ठ गट पुरूष व महिला गटाच्या फेडरेशन कबड्डी स्पर्धेचे आयोजन जोगेश्वरीच्या एसआरपी मैदानावर होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्टÑाच्या दोन्ही संघाचे प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी दोन्ही संघाचे १२-१२ खेळाडू व मार्गदर्शक पोहोचल्यानंतर महिला संघाच्या सरावासाठी पुण्याची १३वी खेळाडू तेथे पोहोचली. अंतिम संघ निवडीच्या वेळी जी १३वी खेळाडू शिबिरात पोहोचली होती तिला अंतिम संघात स्थान देण्यात आले आणि ज्या मुलीच्या (किशोरी) हातात अंतिम निवडीचे पत्र तिला पुन्हा घरी पाठविण्यात आले.
राज्य संघटनेच्या पदाधिकाºयांचे असे प्रकार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एका महिला खेळाडूला पोटात दुखत आहे असे डॉक्टरचे प्रमाणपत्र घेवून घरी पाठविण्यात आले होते व मर्जीतील खेळाडूला स्थान दिले होते. दोन वर्षांपूर्वी बंगळुरू येथे राष्ट्रीय स्पर्धेत मुंबईच्या एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला डावलण्यात आले होते. पण जेव्हा संघटनेच्या पदाधिकाºयांवर वरिष्ठ अधिकाºयाकडून दबाव आला तेव्हा रत्नागिरीच्या एका होतकरू महिला खेळाडूऐवजी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला वजनांसाठी उभे केले.
>कोणत्याही स्पर्धेचे सराव शिबीर १३ का २० खेळाडूंचे घ्यायचे हा अधिकार संघटनेचा आहे. किशोरी शिंदेच्या निवडीबाबत जेव्हा संघाचे मार्गदर्शक सुहास जोशी यांना विचारले असता त्यांनी सांगितले, पूर्वीसारखा तिचा खेळ आता राहिलेला नाही तिचा फिटनेससुद्धा कमी असल्यामुळे तिची अंतिम बारामध्ये निवड करण्यात आली नाही.
- आस्वाद पाटील, राज्य संघटना सचिव