विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:54 PM2017-11-12T22:54:33+5:302017-11-13T10:17:42+5:30

भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे  आयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक  रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्‍वविजेतेपद पटकावले. 

Advani 17th World Winner | विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता

विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये आडवाणी १७ व्यांदा विश्‍वविजेता

Next
ठळक मुद्देआयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपभारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने इंग्लंडच्या माईक रसेल  याला केले पराभूत

ऑनलाइन लोकमत
दोहा : भारताचा दिग्गज क्युइस्ट पंकज आडवाणी याने आज येथे  आयएसएसएफ विश्‍व बिलियर्डस् चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या माईक  रसेल याला पराभूत करत करियरमधील १७ वे विश्‍वविजेतेपद पटकावले. 
आडवाणी याने रसेलला ६-२(0-१५५,१५0-१२८,९२-१५१,१५१- 0,१५१-६,१५१-0,१५0-५८,१५0-२१) असे पराभूत केले. त्याने  १५0 पेक्षा अधिक फ्रेममध्ये आपला किताब वाचवला. त्याने गेल्या वर्षी  बंगळुरूतदेखील विजेतेपद पटाकावले होते. 
पंकज याने बेस्ट ऑफ ११ मध्ये चांगली सुरुवात केली नाही. रसेल याने  १५५ च्या शानदार स्कोअरसह सुरुवात केली. आडवाणी याने लगेचच  पुढची फ्रेम जिंकून बरोबरी साधली.  त्यानंतर आडवाणी याने मागे वळून  पाहिलेच नाही. त्याने सलग पाच फ्रेम जिंकत विजेतेपद पटकावले. कोण त्याही खेळात सर्वाधिक विश्‍वविजेतेपद पटकावणार्‍या आडवाणी याने उ पांत्य फेरीत भारतीय खेळाडू रूपेश शाह ५-२ने तर रसेलने सिंगापूरच्या  पीटर गीलख्रिस्ट याला ५ -१ ने पराभूत केले होते. 

Web Title: Advani 17th World Winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा