पाच भारतीय बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत, ज्योती, शशी, अंकुशिता, नीतू , साक्षी यांचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:42 AM2017-11-22T03:42:09+5:302017-11-22T03:42:19+5:30

गुवाहाटी : ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिस-या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीकडे कूच केली.

In the 5th Indian Boxer quarter-finals, Jyoti, Shashi, Ankushita, Neetu, Sakshi's victory | पाच भारतीय बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत, ज्योती, शशी, अंकुशिता, नीतू , साक्षी यांचे विजय

पाच भारतीय बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत, ज्योती, शशी, अंकुशिता, नीतू , साक्षी यांचे विजय

googlenewsNext

गुवाहाटी : ज्योती गुलिया, शशी चोप्रा, अंकिता बोरो, नीतू घनघास आणि साक्षी चौधरी या भारतीय खेळाडूंनी एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या तिस-या दिवशी मंगळवारी दमदार विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीकडे कूच केली. लाईटवेट गटात नीतू घनघास हिनेदेखील पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना बल्गेरियाची टोडोरोवा इमी मारी हिचा ४-१ ने पराभव केला. सत्रातील अखेरच्या उपउपांत्यपूर्व लढतीत ४५ किलो बँटमवेट गटात साक्षी चौधरीने ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित रशियाची शदाबेवा इंदिरा हिला नमविले.
हरियानाची ज्योती आणि स्थानिक आकर्र्षण असलेली अंकुशिता यांनी चाहत्यांच्या उत्साहात कौशल्य पणाला लावून आपापल्या बलाढ्य प्रतिस्पर्धी बॉक्सरला नमविले. शशी सुरुवातीला सावध खेळली. प्रतिस्पर्धी लीन ली वेईची ताकद आणि कमकुवतपणा लक्षात येताच सातत्यपूर्ण ठोशांच्या बळावर शशीने पुढील दोन्ही फेºयांमध्ये वर्चस्व गाजवून लढत एकतर्फी ठरविली. सरळ ठोसे मारण्यात पटाईत असलेल्या शशीने लीच्या थेट जबड्यावर प्रहार करीत चाहत्यांची वाहवा मिळविली.
अंकुशिताने खास शैलीत विजय साजरा केला. तुर्कस्तानची अलुक कॅगेला हिच्याशी तिची गाठ होती. गुवाहाटीची शान असलेल्या अंकुशिताला कॅगेलावर विजय नोंदविण्याची खुमखुमी होतीच. इस्तंबूल येथे मागच्या महिन्यात झालेल्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत कॅगेलाने अंकुशितावर विजय नोंदविला
होता. आज अंकुशिताने घरच्या रिंगणात कॅगेलावर विजय नोंदवित पराभवाचे
उट्टे काढले.
भारतीय संघाचे हायपरफॉर्मन्स संचालक आणि मुख्य कोच राफेल बर्गामास्को यांनी इस्तंबूलमध्ये सेटबॅक मिळाल्यामुळे या लढतीसाठी डावपेच बदलले होते. सुरुवातीपासून कॅगेलावर तुटून पडायचे आणि तिला संधीच द्यायची नाही, असे हे डावपेच होते. त्यात अंकुशिता यशस्वी ठरली.
‘कॅगेलाने मला स्वत:च्या देशात नमविले. मी या पराभवाची परतफेड करण्याच्या भावनेतून खेळले. माझ्या देशात मी तिला नमवू शकले,’ याचा आंनद वाटत असल्याची प्रतिक्रिया अंकुशिताने विजयानंतर दिली.
नीतू विजयाबद्दल खूष होती. ती म्हणाली, ‘ही लढत माझ्यासाठी सोपी होती. मी याआधीही टोडोरोवाला बल्गेरियात पराभूत केले होते. त्यामुळे तिला कसे तोंड द्यायचे, याची जाणीव होती. पहिल्या फेरीत तिने मला मोकळे खेळण्याची संधी दिली नाही, मग कोचने मला पवित्रा बदलण्याची सूचना केली. पुढील दोन फेºयांमध्ये याचा लाभ झाला.’
>भारतीय खेळाडूंचे निकाल
तिसरा दिवस : लाईट फ्लायवेट (४५ ते ४८ किलो) : नीतू घनघास भारत वि. वि. टोडोरोवा इमी मारी बल्गेरिया ४-१,
फ्लायवेट ५१ किलो : ज्योती गुलिया भारत वि. वि. लिसिन्स्का अनास्तासिया युक्रेन ५-०, बँटमवेट ५४ किलो : साक्षी चौधरी वि. वि. शदाबेवा इंदिरा रशिया ३-२, फिदरवेट ५७ किलो : शशी चोप्रा भारत वि. वि. लीन ली वेई चायनीज तैपेई ५-०, लाईट वेल्टरवेट ६४ किलो : अंकुशिता बोरो भारत वि. वि. अलुक कॅगेला तुर्कस्तान ५-०.

Web Title: In the 5th Indian Boxer quarter-finals, Jyoti, Shashi, Ankushita, Neetu, Sakshi's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.