अमरावतीकर फणफणताहेत तापाने

By Admin | Published: August 9, 2016 12:13 AM2016-08-09T00:13:24+5:302016-08-09T00:13:24+5:30

पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद काही औरच असतो.

Amravati | अमरावतीकर फणफणताहेत तापाने

अमरावतीकर फणफणताहेत तापाने

सावधान ! : 'व्हायरल फिव्हर'ची साथ पसरली
अमरावती : पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद काही औरच असतो. त्याकरिता मेळघाट सहल व इतर प्लॅन्स केले जातात. पण एन्जॉय करताना जरा जपूणच. कारण या वातावरणात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. या दिवसांत जिल्ह्यातील अनेक रुग्ण तापाणे फणफणत आहे.
मागील आठवड्यात व महिनाभरात विविध आजारांचे हजारो रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचे रुग्ण वाढतात. अमरावती शहरात गॅस्ट्रो व व्हायरल फिवरची साथ सुरू आहे. गेल्या महिन्यात अनेक रुग्ण आढळले आहे. दूषित पाणी पिल्यानेही गॅस्ट्रो, कावीळ, ताप व पोटाचे आजार बळावितात. ग्रामीण भागात जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे एक हजार रुग्ण आढळले होते, तर व्हायरल फिवरचे १४०२, टायफाईडचे १७२, डायरियाचे ११३७, नोंद शासकीय यंत्रणेकळे झाली होती. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यात गॅस्ट्रोचे ५०० च्यावर, तर तापाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. मागील चार दिवसांपासून सर्दी, खोकला, घशाच्या आजारात वाढ झाली असून तापाणेही अमरावतीकर फणफणत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये हॉऊ सफुल्ल झाले आहेत. (प्रतिनिधी)

वातावराच्या बदलामुळे सर्व ठिकाणी विविध आजारांचे रुग्ण आढळतात. पण अशी विशिष्ट आजाराची साथ नाही आहे.
- अरुण राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

Web Title: Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.