‘त्या’ चार दालनांचे काम अद्याप अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 1:17am

महिन्याभराचा कालावधी उलटला तरी पनवेल महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींना बसण्यासाठी दालन उपलब्ध झालेले नाही.

पनवेल : महिन्याभराचा कालावधी उलटला तरी पनवेल महापालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींना बसण्यासाठी दालन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सर्व सभापतींनी पालिकेच्या नव्या इमारतीत तळमजल्यावर खाली बसून प्रशासनाविरोधात आंदोलन केले. यावेळी पालिकेच्या वतीने चार दालनांचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्या चार दालनांचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रशासनाचा हा दावा खोटा ठरल्याचे दिसून येत आहे. आंदोलनावेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी आंदोलनकर्ते सभापती यांच्याशी चर्चा करीत पालिका अधिकाºयांची तीन दालने तुम्हाला त्वरित उपलब्ध करून देत उर्वरित चार दालनांचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात दालनांचे काम अपूर्णच आहे. पनवेल महापालिकेचे नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती प्रशिक्षण दौºयासाठी राजस्थान येथील माऊंटअबू या ठिकाणी अभ्यास दौºयासाठी गेले आहेत. गुरुवारी या दालनांमध्ये फ्लोअरिंग, फर्निचरचे काम सुरू असल्याचे दिसून आले. आंदोलनकर्त्या सभापतींना शांत करण्यासाठी काम पूर्ण झाल्याची बतावणी करून आजही दालनात बसू शकता, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रशासनाचा हा दावा खोटा ठरला आहे.

संबंधित

अन्न अधिकार अभियानाचे आज राज्यभर आंदोलन
रेल्वेस्थानक फलाटावर मृत्यूचा सापळा
नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच उपाय
घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता
आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

नवी मुंबई कडून आणखी

अन्न अधिकार अभियानाचे आज राज्यभर आंदोलन
रेल्वेस्थानक फलाटावर मृत्यूचा सापळा
नातेवाइकांचा समजूतदारपणा हाच उपाय
घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता
आठवडे बाजारामागील ‘अर्थ’कारण; स्थानिकांच्या विरोधाला केराची टोपली

आणखी वाचा