विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:19 AM2017-11-24T02:19:51+5:302017-11-24T02:20:02+5:30

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

The work of the airport will be completed in progress, the first phase will be completed in December 2019 | विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

Next

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुनर्वसन प्रक्रियेत अद्यापि काही अडथळे आहेत; परंतु येत्या काळात तेही दूर केले जातील. एकूणच विमानतळाचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच म्हणजेच, डिसेंबर २०१९मध्ये पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याची माहिती सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिली.
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११६० हेक्टर जागेवर सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीड फिल्ड पद्धतीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. २०१९पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रकल्पपूर्व सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, उलवे नदीचे पात्र बदलणे व विमानतळाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे, या कामांचा समावेश आहे. सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी प्रसारमाध्यमांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बेलापूर येथील सिडको गेस्ट हाउसमध्ये पत्रकारांसमोर या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३००० कुटंबांचे वडघर आणि वहाळ येथे विकसित भूखंड देऊन पुनर्वसन केले जाणार आहे. आतापर्यंत १९७७ भूखंड विकसित करण्यात आले असून, उर्वरित फेब्रुवारी २०१८पर्यंत विकसित केले जातील. एकूण प्रकल्पबाधितांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांनी स्थलांतरण करून विकसित भूखंडांचा ताबा घेतला आहे. तर ७५० प्रकल्पबाधितांनी भूखंडांचे करारनामे केल्याची माहिती प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या एक-दोन मागण्या प्रलंबित आहेत. राज्य सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले. विमानतळ उभारणीचे काम जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत प्रकल्पपूर्व कामे पूर्ण करून नियोजित विमानतळाची जागा कंपनीच्या ताब्यात दिली जाईल. डिसेंबर २०१९मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, विमानतळ प्रकल्पाचे मुख्य अभियंता आर. बी. धायटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: The work of the airport will be completed in progress, the first phase will be completed in December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.