शहरात जागोजागी कचरा , पनवेलमध्ये आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 07:10 AM2018-02-03T07:10:18+5:302018-02-03T07:10:36+5:30

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गुरुवारपासून सिडकोने कचरा उचलणे बंद केल्याने सिडको वसाहतीत सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोकडून आतापर्यंत कचरा हस्तांतरणाला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

 Waste Hazards in the city, health issues in Panvel | शहरात जागोजागी कचरा , पनवेलमध्ये आरोग्याचा प्रश्न

शहरात जागोजागी कचरा , पनवेलमध्ये आरोग्याचा प्रश्न

googlenewsNext

- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गुरुवारपासून सिडकोने कचरा उचलणे बंद केल्याने सिडको वसाहतीत सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोकडून आतापर्यंत कचरा हस्तांतरणाला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, प्रभावी यंत्रणा उभी करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचा गंभीर आरोप सत्ताधाºयांकडून करण्यात येत आहे.
महापालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल, तळोजा आदी अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. कचरा हस्तांतरणाचा ठराव सत्ताधारी भाजपाने सभागृहात पारित केला आहे. त्यानंतर सिडको हा कचरा पालिकेकडे हस्तांतरण करणार, हे निश्चित झाले होते. १ फेब्रुवारी रोजी सिडकोने कचरा उचलणे बंद केल्यानंतर पालिका प्रशासन यासंदर्भात उपाययोजना राबवून कचरा उचलणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेकडून कचरा उचलण्यास टाळाटाळ केली जात आहे. वसाहतीतील रहिवाशांकडूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
एकीकडे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार जाहिरात केली जात असताना, कचरा समस्येमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. सभागृहनेते परेश ठाकूर यांनी, महापालिकेकडून यासंदर्भात चालढकल करण्यात येत आहे. पालिका प्रशासन केवळ दिखावेगिरी करीत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.
सध्या महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पथनाट्य, जनजागृती, भिंती रंगवणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वेक्षण होईपर्यंत सिडकोकडून कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आल्याने कचरा हस्तांतरणाचा विषय आणखी दीड महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शहरातील कचरा उचलला नाही, तर सिडकोच्या दारात टाकू, असा इशारा नगरसेवक हरेश केणी यांनी दिला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत १५ मार्चपर्यंत सिडकोच कचरा उचलेल. त्यानंतर हस्तांतरणाची प्रक्रि या आयुक्तांच्या मार्फत पार पडल्यानंतर पालिका कचरा उचलण्यास सुरु वात करेल. सिडकोने कचरा उचलण्याचे मान्य केले आहे.
- संध्या बावनकुळे,
उपायुक्त, पनवेल महापालिका
स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने पालिकेच्या पदाधिकाºयांनी सिडकोला कचरा उचलण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार १५ मार्चपर्यंत सिडको कचरा उचलणार आहे. १५ मार्चनंतर पनवेल महानगरपालिका कचरा उचलणार आहे.
- मोहन निनावे,
जनसंपर्क अधिकारी, सिडको
महापालिका कचरा हस्तांतरणाबाबत चालढकल करीत आहे. पालिका प्रशासन केवळ दिखावेगिरी करीत असून, सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. कचरा हस्तांतरणाचा ठराव झाला असताना पालिका मुद्दामहून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.
- परेश ठाकूर,
सभागृहनेते, पनवेल महापालिका
नागरिकांच्या पालिकेकडून अपेक्षा वाढत आहेत. मात्र, अशाप्रकारे समस्या उद्भवल्यास त्याला पालिकाच जबाबदार आहे. कचरा दोन-दोन दिवस उचलला जात नसेल, तर गंभीर आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. - दीपक शिंदे, नागरिक, खारघर
आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे पनवेलकरांवर ही वेळ आली. आयुक्त हेतुपुरस्सर कचरा हस्तांतरणात खोडा घालत आहेत. ठराव झाला असताना पालिका कचरा का उचलत नाही.
- जगदीश गायकवाड,
नगरसेवक, भाजपा

आमदारांचे सिडकोला पत्र
पनवेल महानगरपालिका व सिडको यांच्यातील आरोग्य सेवा हस्तांतरणातील वादात पनवेलचे नागरिक भरडले जात आहेत. त्यातच पनवेलचे महापौर आणि आयुक्त हे नगरविकास खात्यामार्फत आयोजित केलेल्या अभ्यासदौºयासाठी परदेशात गेल्याने याबाबत पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील सिडको विकसित वसाहतीमधील कचरा उचलण्याबाबत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सिडको प्रशासनास कचरा उचलणे चालू ठेवण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली आहे.
 

Web Title:  Waste Hazards in the city, health issues in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.