पोलिसांना प्रतीक्षा रुट कॉल अ‍ॅनेलेसिसची

By admin | Published: July 17, 2017 01:35 AM2017-07-17T01:35:45+5:302017-07-17T01:35:45+5:30

जेएनपीटीतील सायबर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीकडे रुट कॉल अ‍ॅनेलेसिस रिपोर्ट मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर

Waiting for police call waiting Analyze | पोलिसांना प्रतीक्षा रुट कॉल अ‍ॅनेलेसिसची

पोलिसांना प्रतीक्षा रुट कॉल अ‍ॅनेलेसिसची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जेएनपीटीतील सायबर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीकडे रुट कॉल अ‍ॅनेलेसिस रिपोर्ट मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याठिकाणच्या नेमक्या कोणत्या संगणकावर प्रथम वायरस हल्ला झाला हे उघड होईल. त्यानंतर तपासाची दिशा ठरवता येणार असल्याने गुन्हे शाखा पोलीस या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
गतमहिन्यात जेएनपीटीच्या सर्वरवर अज्ञाताने खंडणीच्या उद्देशाने सायबर हल्ला केला होता. पेंट्या वायरसच्या माध्यमातून सायबर हल्ल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले. वायरसमुळे त्याठिकाणचे अडीचशेहून अधिक संगणक ठप्प होवून यंत्रणा कोलमडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. नवी मुंबईत प्रथमच खंडणीसाठी अशा प्रकारे हल्ला झालेला आहे. हा हल्ला बाहेरच्या देशातून झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचीही कसोटी लागणार असून कंपनीकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही.

Web Title: Waiting for police call waiting Analyze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.