VIDEO : एक्स्प्रेसमधून पडणाऱ्या प्रवाशासाठी आरपीएफ जवान ठरला देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 08:08 AM2018-07-16T08:08:06+5:302018-07-16T09:07:22+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानानं जिवाची बाजी लावून एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

VIDEO: Railway Police personnel save a man's life while he was trying to board a train at Panvel railway station | VIDEO : एक्स्प्रेसमधून पडणाऱ्या प्रवाशासाठी आरपीएफ जवान ठरला देवदूत

VIDEO : एक्स्प्रेसमधून पडणाऱ्या प्रवाशासाठी आरपीएफ जवान ठरला देवदूत

googlenewsNext

पनवेल - हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाचा जवान आणि प्रवाशांनी मिळून एका माणसाचा जीव वाचवला आहे. पनवेल स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेमध्ये चढताना हा प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. यावेळी तो एक्स्प्रेसखाली येण्याचीदेखील शक्यता होती. मात्र रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचा सतर्क जवानानं त्याला वेळीच मागे खेचले आणि त्याचे प्राण वाचवले. 14 जुलैला ही घटना घडली आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विनोद शिंदे हे प्रवासी रवी बाळूसाठी  देवदूत ठरले आहेत. 

रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी कर्मचा-यांची 'चिंधी'गिरी, प्रवाशांच्या जिवाशी खेळ )

शनिवारी (14 जुलै) संध्याकाळी पनवेल स्थानकात पनवेल-नांदेड एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात रवी बाळूचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला.  तो लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीमध्ये सापडण्याची यावेळी भीती होती. यावेळी स्वतःच्या जिवाची काळजी न करता विनोद शिंदे यांनी रवी बाळूला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि एक्स्प्रेसखाली येण्यापासून त्याचा बचाव केला. 
 



 

 

Web Title: VIDEO: Railway Police personnel save a man's life while he was trying to board a train at Panvel railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.