Various dance forms of the Panvel Festival | पनवेल फेस्टिव्हलमध्ये विविध नृत्यांचा कलाविष्कार
पनवेल फेस्टिव्हलमध्ये विविध नृत्यांचा कलाविष्कार

कळंबोली : रोटरी क्लब आयोजित पनवेल फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी समूह नृत्याचा कलाविष्कार उपस्थितांना पाहावयास मिळाला. अतिशय दर्जेदार नृत्य सादर करीत कलाकारांनी सर्वांची मने जिंकून घेतली. ‘गजर माउली’च्या नृत्यातून चार मिनिटांत पंढरी नगरीचे दर्शन घडविले. ‘लोकमत’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.
भव्य-दिव्य स्वरूपाच्या रंगमंचावर विद्युत रोषणाईच्या झगमगाटात समूह नृत्य स्पर्धा पार पडली. पनवेल, विरार, ठाणे, कौपरखैरणे, भांडुप, अलिबाग, मरिन लाइन, सीवूड येथून २४ संघांनी समूह नृत्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. रम्य प्रसाद ग्रुपने ‘मधुबन तुम्हारी लिला तक धीन’ या गीतावर सात नर्तिकांनी नृत्य सादर केले. ‘देखो इने तारे जमीपर’ या गाण्यावर फिल गु्रपने नृत्य सादर करीत प्रेक्षकांच्या मनामध्ये या कार्यक्र माची फिल निर्माण केली. अफ्रिकेत लोकप्रिय असलेले हिपॉप हे नृत्य गुरुवारी पनवेल फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात आले. अनोनिक्र व्ह या गु्रपने अतिशय उत्तम सादरीकरण करून तरुणाईला थिरकायला लावले. नुपुल डान्स अकादमीने फ्री स्टाइल डान्स करीत वातावरण फ्री केले. पनवेलच्या भैरी भवानी ग्रुपच्या आठ जणांनी पारंपरिक नृत्य सादर केले. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध परंपराची आठवण करून देण्यात आली. जय हनुमान ग्रुपच्या १७ कलाकारांनी ‘गजर माउली’चा या गीतावर जबरदस्त नृत्याविष्कार सादर केला. वारकरी, टाळकरी, वीणेकºयांनी केलेल्या हरिनामाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले. संत ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, यांच्या वेशात पंढरीच्या विठ्ठलाचे नामस्मरण करणाºयांना, उपस्थितांना कलाकारांनी भक्तिरसात न्हाऊन काढले.
या कार्यक्र मात राजस्थानमधील पारंपरिक ‘चिरमी’ नृत्य एम.एम.पी. शहा गु्रपने सादर केले. स्टेप अर्ट या चमूने, ‘वाट रोजची वळण वाकडे’ या गीतावर एक प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन केले. त्यामध्ये पैशाचा पाऊस, नरबळीसह इतर अनिष्ट प्रथांवर प्रकाश टाकण्यात आला. विक्र ोळीच्या मेहूल अ‍ॅकॅडमीच्या २२ स्पर्धकांनी, ‘बजने दे धडक धडक’ हे बहारदार नृत्य केले. या स्पर्धेचे परीक्षण उमेश जाधव, सुभाष नकाशे यांनी केले, तर सूत्रसंचालन रुचिता जाधव यांनी आपल्या शैलीत केले. या वेळी रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन संतोष अंबावने, राजाभाऊ गुप्ते, किरण परमार, नितीन मुनोत, सतीश पावसे, जयदेव कर्वे, अमय सावळेकर, अमर म्हात्रे, मिलिंद पर्वते, रमेश भोळे यांच्यासह रोटरीयन्स सदस्य उपस्थित होते. फेस्टिव्हलचे संयोजक टटल्स इंटरटेन्मेंटचे उदय पानसरे यांच्यासह त्यांच्या चमूने स्पर्धा यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले. या वेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष पत्रकार सय्यद अकबर यांच्यासह इतर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
जय हनुमान ग्रुप प्रथम
या स्पर्धेत जय हनुमान
ग्रुपला प्रथम क्र मांकाचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्र मांक नुपुल डान्स अकादमीला मिळाला. त्यांना १५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तिसरा क्र मांक साई लीला रंगमंच, मेहूल डान्स अकादमीला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. त्यांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षीस आरटीएन, फ्लाय हाय, भैरी भवानी या ग्रुपला प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आले.


Web Title: Various dance forms of the Panvel Festival
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.