अनधिकृत वाहन पार्किंगचा वाहतूक पोलिसांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 04:18 AM2019-02-21T04:18:40+5:302019-02-21T04:18:54+5:30

स्थानक परिसरात वाहतुकीचा बोजवारा : शहरातील अंतर्गत रस्त्यांनाही वाहनतळाचे स्वरूप

Unauthorized vehicle parking traffic police police fever | अनधिकृत वाहन पार्किंगचा वाहतूक पोलिसांना ताप

अनधिकृत वाहन पार्किंगचा वाहतूक पोलिसांना ताप

Next

नवी मुंबई : शहरात सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला आहे. बेकायदा पार्किंगमुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहराला बकालपण आले आहे. पदपथ व सार्वजनिक ठिकाणी बेमालूमपणे पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक पोलिसांना डोकेदुखी झाली आहे.

घणसोली स्थानक परिसरात ठिकठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहे. या फलकाकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक सर्रासपणे येथे आपल्या दुचाकी उभ्या करतात. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे दिवसेंदिवस येथे दुचाकीची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे या बेकायदा पार्किंगमुळे गुन्हेगाराचे फावले आहे. कोणाचेही नियंत्रण नसल्याने येथून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांना आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. घणसोलीप्रमाणेच शहरातील बहुतांशी स्थानक परिसरात बेकायदा पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शहरातील वसाहतीअंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणचे नो पार्किंग झोन आदी ठिकाणी बेमालुमपणे वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.

वसाहतीअंतर्गत रस्ते सुद्धा बेकायदा पार्किंगमुळे व्यापले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक, खासगी बसेस व इतर व्यवसायिक वाहने उभी केली जातात. त्यामुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखी निमुळते झाले आहेत. याचा फटका वाहतुकीला बसला आहे.
शाळा व हॉस्पिटलच्या परिसरात तर नेहमीच वाहतूककोंडीचे चित्र पाहायला मिळते. या बेशिस्त व अनधिकृत पार्किंगमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत पार्किंग करणाºयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title: Unauthorized vehicle parking traffic police police fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.