शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:54 PM2019-05-24T22:54:20+5:302019-05-24T22:54:25+5:30

दुचाकीला जीपची धडक : डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांत वाढ

Two injured in two different accidents in the city | शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

Next

नवी मुंबई : शहरात दोन ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संबंधित दोषी वाहनचालकांनी घटनास्थळावरून पळ काढलेला आहे.


नेरुळ व वाशी पोलीसठाण्यात या दोन्ही अपघातांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. शिरवणे येथे राहणारे विश्वनाथ म्हसकर (६१) हे दुचाकीवरून जात असताना गुरुवारी जुईनगर सेक्टर २४ येथे त्यांना पिकअप जीपने धडक दिली. यामध्ये ते जखमी होऊन रस्त्यावर कोसळले असता, जीप (एमएच ४६ ई २८४२) यावरील चालकाने त्यांना मदतीसाठी न थांबता तिथून पळ काढला.


अखेर प्रत्यक्षदर्शींनी म्हसकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे विकास शिंदे यांना वेगवान डम्परने धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत.
शिंदे हे कामोठेचे राहणारे असून, सायन-पनवेल मार्गाने दुचाकीवरून चालले होते. या वेळी पाठीमागून आलेल्या डम्पर (एमएच ०२ ईआर ३३३९)ने शिंदे यांच्या दुचाकीला धडक मारून पळ काढला. यामध्ये ते जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित वाहनांच्या चालकांविरोधात नेरुळ व वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारपाड्यात शिवशाहीची उड्डाणपुलाला धडक
पनवेल : खारपाडा येथील उड्डाणपुलाला शिवशाही बसने दिलेल्या धडकेत एक प्रवासी जखमी झाला.
या प्रकरणी तालुका पोलीसठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास जगताप असे चालकाचे नाव आहे. पनवेलहून अलिबागच्या दिशेला शिवशाही बस (एमएच ०६ बी एन ५४१) जात होती. ही बस खारपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता तिने उड्डाणपुलाच्या कठड्याला धडक दिली. धडकेत माधवराव गणपतराव खेरडे (४८) जखमी झाले. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. तालुका पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ीाल इतर प्रवासी
सुदैवाने बचावले.

Web Title: Two injured in two different accidents in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.