सायन-पनवेल महामार्गावर दोन अपघात, सानपाड्यामध्ये डम्पर पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:45 AM2019-02-08T02:45:35+5:302019-02-08T02:45:44+5:30

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता डम्पर उलटून दोघे जण जखमी झाले. कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजता ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला.

Two accidents on the Sion-Panvel highway, turn dumper into the sunpad | सायन-पनवेल महामार्गावर दोन अपघात, सानपाड्यामध्ये डम्पर पलटी

सायन-पनवेल महामार्गावर दोन अपघात, सानपाड्यामध्ये डम्पर पलटी

Next

नवी मुंबई, पनवेल : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडामध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता डम्पर उलटून दोघे जण जखमी झाले. कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजता ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. यामुळे दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
महामार्गावर धीम्या गतीने सुरू असलेले काँक्रीटीकरणाचे काम तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक नसल्यामुळे वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ होते आहे. वाशी ते कळंबोली दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात परावर्तक पट्ट्या लावण्यात आलेल्या नाहीत, यामुळे वारंवार अपघात होत आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारा डम्पर पहाटे सानपाडा पुलावरून जात होता. मात्र, काँक्रीटीकरणासाठी खोदलेला रस्ता चालकाच्या लक्षात न आल्याने डम्पर खड्ड्यात उलटला. यामध्ये चालक आणि वाहक दोघे जखमी झाले. सीआरपीएफचे जवान पनवेलकडे जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. जखमी चालक व वाहकाला त्यांनी तात्काळ त्यांच्या गाडीतून महापालिकेच्या रुग्णालयात नेऊन भरती केले. पोलिसांनी के्रनच्या साहाय्याने डम्पर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

कोपरा पुलाजवळही पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. या अपघातामध्ये चालक जखमी झाला आहे. येथेही काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. पुलावर बॅरिकेड्स ठेवण्यात आले आहेत. येथे वाहतुकीमध्ये केलेल्या बदलाचा चालकाला अंदाज येत नाही. काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सूचना देण्यात आल्या नसल्याने अपघातांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांनीही ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.

सीआरपीएफच्या जवानांचे कौतुक : सानपाडामध्ये पहाटे अपघात झाल्यानंतर महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनीही गर्दी करण्यास सुरुवात केली होती. येथून जाणाºया सीआरपीएफ च्या जवानांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ जखमी चालक व वाहकाला त्यांच्या कारमधून महापालिका रुग्णालयात नेऊन भरती केले. जवान दिनेश वाघ व त्यांच्या सहकाºयांचे नागरिकांनीही कौतुक केले.

Web Title: Two accidents on the Sion-Panvel highway, turn dumper into the sunpad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.