हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 01:32 PM2017-12-21T13:32:42+5:302017-12-21T13:38:37+5:30

हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे.

Transport disrupted on the Harbor-Transhurbar railway route | हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी हैराण

हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रवासी हैराण

Next

मुंबई - हार्बर, ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. खांदेश्वर आणि मानसरोवरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे. दोन्ही दिशेने जाणा-या लोकल सेवेवर यामुळे परिणाम झाला आहे. बिघाडामुळे लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू आहे. दरम्यान, बिघाड दुरुस्त करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या अधिका-यांना हार्बर रेल्वे मार्गावरील खोळंब्याची काहीही कल्पना नसल्याची माहिती समोर आली आहे. लोकल सुरळीत असल्याचे मध्य रेल्वे सांगितले. तर दुसरीकडे, रेल्वे पोलिसांनी हार्बर रेल्वे पोलिसांनी हार्बर रेल्वे मार्गावरील खांडेश्वर व मानसरोवर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिली.


 

Web Title: Transport disrupted on the Harbor-Transhurbar railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.