आयकर विभागाकडून व्यवहाराची चौकशी; टीडीएसविषयी तपासल्या नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या फायली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:04 AM2018-01-11T01:04:06+5:302018-01-11T01:04:13+5:30

आयकर विभागाने अचानक नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांतील फायलींची विशेष तपासणी सुरू केली. मंगळवारी दिवसभर व पूर्ण रात्र ही तपासणी सुरू होती. त्यामुळे पालिकेवर धाड पडल्याचे वृत्त शहरभर पसरून खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाने मात्र ही धाड नसून, टीडीएससाठी तपासणी असल्याचे स्पष्ट केले आहे.

Transaction inquiry by Income Tax Department; Important files in Navi Mumbai Municipal Corporation examined about TDS | आयकर विभागाकडून व्यवहाराची चौकशी; टीडीएसविषयी तपासल्या नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या फायली

आयकर विभागाकडून व्यवहाराची चौकशी; टीडीएसविषयी तपासल्या नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या फायली

Next

नवी मुंबई : आयकर विभागाने अचानक नवी मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांतील फायलींची विशेष तपासणी सुरू केली. मंगळवारी दिवसभर व पूर्ण रात्र ही तपासणी सुरू होती. त्यामुळे पालिकेवर धाड पडल्याचे वृत्त शहरभर पसरून खळबळ उडाली होती. पालिका प्रशासनाने मात्र ही धाड नसून, टीडीएससाठी तपासणी असल्याचे स्पष्ट केले आहे.
मंगळवारी आयकर विभागाच्या अधिकाºयांनी टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स (टीडीएस)विषयी विविध फायलींची तपासणी सुरू केली. लेखा, नगररचना व शहर अभियांत्रिकी विभागातील कामकाजाची तपासणी सुरू केली होती. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी आयकर विभागाच्या अधिकाºयांना आवश्यक ती माहिती अधिकाºयांनी पुरवावी अशा सूचना केल्या होत्या. यामुळे सर्व अधिकारी मुख्यालयामध्ये तळ ठोकून होते. मंगळवारी सुरू झालेली तपासणी बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती.

आयकर विभागाच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांमध्ये टीडीएसविषयी तपासणी केली जाते. मंगळवारी महापालिकेमध्ये तपासणी करण्यासाठी पथक आले होते. ते त्यांचा अहवाल सादर करतील. त्यात जर काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारण्यात येतील.
- रामास्वामी एन., आयुक्त, महापालिका

Web Title: Transaction inquiry by Income Tax Department; Important files in Navi Mumbai Municipal Corporation examined about TDS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.