एपीएमसीमध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:36 AM2019-01-06T04:36:08+5:302019-01-06T04:37:01+5:30

पालिका आयुक्तांचे आदेश : शहरातील विकासकामांची केली पाहणी

Take action on those who use plastic in APMC | एपीएमसीमध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करा

एपीएमसीमध्ये प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करा

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाºया किरकोळ व होलसेल व्यापाºयांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. नियम तोडून पर्यावरणाचा ºहास करणाºयांना अभय दिले जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी शनिवारी वाशी, बेलापूर, तुर्भे परिसरातील कामांची पाहणी केली. बेलापूर सेक्टर १ ए येथील मँगो गार्डन मधील सुविधांची व साफसफाईची पाहणी केली. तेथील कंपोस्ट पीट्सची पाहणी करून त्यामध्ये उद्यानातील सर्व कचरा नियमित टाकण्यात यावा, अशा सूचना केल्या. सेक्टर-३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलानजीकच्या मार्केटमध्ये असणाºया भाजीवाल्यांकडे एपीएमसी मार्केट मधून भाजी आणताना प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्यांमधून भाजी आणली जाते, हे निदर्शनास आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे एपीएमसी मार्केटमधून होलसेल स्वरूपात भाजी आणताना अशा स्वरूपाच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भाजी देणाºया होलसेल दुकानदारांवरही कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळाला भेट देऊन आयुक्तांनी सकाळपासून प्रकल्पस्थळी आलेल्या कचरागाड्यांची संख्या व त्यामधून आणलेल्या कचºयाची तपासणी केली. ओला व सुका कचरा वेगवेगळा आणणे तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रक्रि या होणे, या प्रकल्पांच्या कार्यवाहीची त्यांनी पाहणी केली. खत प्रकल्प तसेच प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स प्रकल्प याचीही पाहणी करत लीचेड ट्रिटमेंट प्रकल्पस्थळी अधिक चांगल्या रीतीने कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.

वाशी रेल्वेस्थानकासमोरील कामांचीही पाहणी केली. रेल्वेच्या कंत्राटदारांमार्फत सुरू असलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या परिसरात नेहमीच नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी स्वच्छता संदेश फलक, होर्डिंग अशा माध्यमातून जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले. दुकानदारांनी आपल्या समोरील परिसर स्वच्छ राहील इकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करताना ओल्या व सुक्या कचºयासाठी स्वतंत्र कचराकुंड्या ठेवाव्यात, असे सूचित केले. वाशी डेपो परिसरात भेट देऊन आयुक्तांनी स्वच्छतेची व शौचालयाची पाहणी केली.

च्प्लॅस्टिकचा वापर करणाºया व्यापाºयांवर कडक कारवाईचे आदेश आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिले आहेत.

Web Title: Take action on those who use plastic in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.