जलतरणपटू ज्योत्स्ना पानसरे : पाण्याशी मैत्री...पदकांची सेंच्युरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 02:34 AM2017-09-24T02:34:08+5:302017-09-24T02:34:12+5:30

लहानपणीच आजोबांना पोहताना पाहून तिनेदेखील पाण्यात उडी मारली आणि पाण्याशी कायमची दोस्ती केली. वयाच्या पाचव्या वर्षी ज्योत्सनाने पहिल्यांदा जलतरणाचे धडे गिरविले.

Swimmer Jyotsana Pansare: Friendship With Water ... Centuries Of Medals ... | जलतरणपटू ज्योत्स्ना पानसरे : पाण्याशी मैत्री...पदकांची सेंच्युरी...

जलतरणपटू ज्योत्स्ना पानसरे : पाण्याशी मैत्री...पदकांची सेंच्युरी...

googlenewsNext

- प्राची सोनवणे ।

नवी मुंबई : लहानपणीच आजोबांना पोहताना पाहून तिनेदेखील पाण्यात उडी मारली आणि पाण्याशी कायमची दोस्ती केली. वयाच्या पाचव्या वर्षी ज्योत्सनाने पहिल्यांदा जलतरणाचे धडे गिरविले. आत ती आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धत भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंच्या यादीतही ज्योत्स्ना राजेंद्र पानसरे हिचा समावेश आहे.
ज्योत्स्नाने आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय सुवर्ण, ७२ राष्ट्रीय सुवर्ण पदक, २१ रौप्य, १३ कांस्य पदक पटकविले आहे. ज्योत्सनाचे आजोबा हे त्या काळातील एक उत्कृष्ट जलतरणपटू होते. वाशीत फादर एग्नेल शाळेत शिकत असताना पहिल्यांदा तिला प्रशिक्षक गोकूळ कामत यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्यातील जिद्द, मेहनत पाहता कामत कामत यांनी तिला जलतरण स्पर्धेत उतरविले. त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षीच ज्योत्स्नाने पहिल्यांदा राष्ट्रीय पदक पटकविले. कॉमन वेल्थ गेम्समध्येही ज्योत्स्ना सहभागी झाली होती. दोन वर्षे तिने अमेरिकेतील फ्लोरिडा येथून पोहण्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेतले आहे. या काळात कुटुंबापासून दूर राहून तिला कठोर परिश्रमही घ्यावे लागले. राज्य स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षांखालील गटामध्ये यशस्वी कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत ज्योत्स्नाने कित्येक स्पर्धेत वैयक्तिक विजेतेपदही मिळविले.
पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्र ीडानगरीत २०११मधील जुलै महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये ज्योत्स्ना हिने १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत १ मिनीट ०७.५३ सेकंदांत जिंकली. त्यामध्ये आसामच्या फरिहाझमानने केलेला १ मि. ०९.०३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढून ज्योत्स्नाने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
आपल्या आजोबांकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगताना, ८० वर्षांचे तिचे आजोबा आजही पोहत असल्याचे तिने सांगितले.
कुटुंबातील सर्वांनाच खेळाची आवड असून, प्रत्येक जण आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असल्याचेही तिने स्पष्ट केले. दररोज न चुकता चार तास सराव करत असल्याची माहिती ज्योत्स्नाच्या पालकांनी दिली आणि वर्षानुवर्षे यामध्ये खंड पडत नसल्याची माहिती तिची आई अर्चना पानसरे यांनी दिली. सध्या ती आॅट्रेलीयन कोच पीटर यांच्याकडून मार्गदर्शनाखाली सराव करत असून, लवकरच आॅलम्पिक पर्यंतची मजल गाठणार असल्याचेही तिच्या पालकांनी सांगितले. २०१०-११ सालचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्या नवी मुंबईच्या या कन्येचे सर्वच स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. या पुरस्काराने आणखी प्रोत्साहन मिळाले असून, यापुढेही या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजाविणार असल्याचे ज्योत्स्नाने ठामपणे सांगितले. सध्या ती नेरुळ येथील एमजीएम महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे. सराव, स्पर्धा, योगाभ्यास यामध्ये खंड न पाडता अभ्यासावरही तितकेच लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती ज्योत्स्नाच्या पालकांनी दिली.

आध्यात्माची जोड
वाढती स्पर्धा, ताण-तणाव, थकवा दूर करण्यासाठी तिने श्री श्री रवि शंकर यांच्या आर्ट आॅफ लिव्हिंगच्या संस्थेच्या माध्यमातून मेडिटेशनचे धडे घेतले आणि सूदर्शन क्रि या करण्यास सुरु वात केली. गेली तीन वर्षे ती प्रसार करमरकर यांच्याकडे रेकी अभ्यास शिकत आहे. योगाभ्यासामुळे ज्योत्स्नाला चांगलीच मदत होत असून भरपूर ऊर्जा मिळत असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Swimmer Jyotsana Pansare: Friendship With Water ... Centuries Of Medals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.