अ‍ॅम्फिबीअस बस प्रकल्पाचा प्रस्ताव स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 02:49 AM2018-10-21T02:49:37+5:302018-10-21T02:49:42+5:30

शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.

Suspended Proposal for Amphibius Bus Project | अ‍ॅम्फिबीअस बस प्रकल्पाचा प्रस्ताव स्थगित

अ‍ॅम्फिबीअस बस प्रकल्पाचा प्रस्ताव स्थगित

Next

नवी मुंबई : शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता; परंतु राष्ट्रवादी काँगे्रसने या प्रस्तावास आक्षेप घेतला. विरोधी पक्षांनी मात्र ही बससेवा सुरू करण्याचा आग्रह धरला; परंतु सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध असल्यामुळे तो पुन्हा स्थगित करण्यात आला.
नेरुळ सेक्टर-२६ मधील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये व शहरातील महत्त्वाच्या उद्यान परिसरामध्ये ही बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या बससेवेसाठी जवळपास जवाहरलाल नेहरू पतन न्यास (जेएनपीटी)ने ही बस महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा पूर्ण खर्च जेएनपीटीच करणार असून, उत्पन्नातील २५ टक्के वाटा पालिकेला दिला जाणार आहे. आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता; परंतु त्या सभेमध्ये या बसमार्गाचा विस्तार करण्यात यावा. वाशीतील सागर विहार व तेथून ऐरोलीपर्यंत ही बससेवा नेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली होती. यानंतर प्रशासनाने जेएनपीटीकडील अधिकाऱ्यांना या विषयी माहिती दिली होती. संबंधितांनी दोन्ही मार्गांचे परीक्षण केले होते. वाशीतील धारण तलावात तीव्र उतार व खडकाळ भाग असल्याने अ‍ॅम्फिबीअस बसचे परिचलन करणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. ऐरोली खाडीक्षेत्रात सदर बससेवा सुरू करण्याविषयी फेब्रुवारीमध्ये पाहणी केली होती. क्षेत्रीय वनाधिकारी एम. एस. बोथे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. या क्षेत्रामध्ये वनविभागाकडून बोट सेवा सुरू आहे. हे क्षेत्र फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्यामुळे तेथे सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनाने ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. या विषयावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी हा प्रस्ताव स्थगित करण्याची सूचना मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह एम. के. मढवी व इतर नगरसेवकांनी सत्ताधाºयांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी भूमिका मांडली; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देऊन तो पुन्हा स्थगित केला आहे.
>आयुक्तांनी घेतली हरकत
सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वीच बस प्रकल्प स्थगित करण्याची सूचना मांडली. यामुळे आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाइंट आॅफ आॅर्डर म्हटले. सभागृहामध्ये नगरसेवक दुसºया सदस्याच्या भाषणावर पॉइंट आॅफ आॅर्डर घेत असतात; परंतु पहिल्यांदा आयुक्तांनी अशाप्रकारे हरकत घेतली. सत्ताधाºयांकडून प्रशासनाचे ठराव फेटाळण्याचे किंवा स्थगित करण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे आयुक्तांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही बस जेएनपीटी आपणास देणार असल्यामुळे पालिकेचे काहीही नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट केले.
>विरोधी पक्षाचे नगरसेवक आग्रही
विरोधी पक्षनेते विजय चौगुले, एम. के. मढवी, गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होणार नाही. बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. सत्ताधाºयांनी विनाकारण त्याला विरोध करू नये, अशी भूमिका मांडली.
>सत्ताधाºयांना
बसेसविषयी शंका
सत्ताधारी राष्ट्रवादीचे अनंत सुतार, रवींद्र इथापे, देविदास हांडे-पाटील, सूरज पाटील यांनी या विषयावर चर्चा करताना विविध शंका उपस्थित केल्या. या प्रकल्पाला विरोध नाही; परंतु सागर विहार ते ऐरोली दरम्यान बससेवा सुरू करण्यासाठी नक्की काय सर्वेक्षण केले व इतर सर्व माहिती देण्याची मागणी केली. हांडे-पाटील यांनी या बसचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला.

Web Title: Suspended Proposal for Amphibius Bus Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.