महिलेची लहान मुलासह आत्महत्या , ऐरोलीतली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 4:56am

आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला.

नवी मुंबई  - आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. ऐरोली सेक्टर १७ येथे पालिकेच्या वतीने नाट्यगृहाचे काम सुरू आहे. अर्धवट स्थितीतल्या खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मंगळवारी सकाळी मृतदेह तरंगत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. या वेळी तो मृतदेह महिलेचा असून, पाठीला ओढणीने लहान मुलालाही बांधलेले असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान महिलेचे नाव शोभा संदीप वाळुंबे (३०) व मुलाचे नाव अर्जुन (५ वर्षे) असल्याचे कळले. घटनास्थळापासून काही अंतरावरच ते राहत होते. शोभा यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांनीही आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती, असे समजते. यानंतर एक मुलगा व मुलगी यांच्यासह त्या सासू-सासºयांसोबत राहत होत्या; परंतु काही दिवसांपासून शोभा याही आजारामुळे त्रस्त होत्या. त्यावरील उपचार खर्च त्यांना परवडत नव्हता. सासरे एकटेच कमवते असल्याने कुटुंबाची आर्थिक कोंडी झाली होती. या नैराश्यात यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. सदर घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले. सोमवारी पहाटेपासून शोभा या मुलासह बेपत्ता झाल्या होत्या. शोभा यांनी लिहिलेली चिठ्ठी घरी सापडली असून, त्यात आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचे लिहिलेले आहे.

संबंधित

पालिका कर्मचाऱ्यांना स्थायी समितीत २२ हजार सानुग्रह अनुदान
आद्यक्रांतिकारकांच्या वाड्याची दुरवस्था; पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष
सक्तीची सेवानिवृत्ती दिल्याने दिलीप सोनावणे यांनी मंत्रालयात केला आत्महत्येचा प्रयत्न 
शेअर बाजार गडगडल्याने वृद्धाने गळफास घेऊन केली आत्महत्या 
कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप

नवी मुंबई कडून आणखी

कंत्राटी कामगारांचा मोर्चा मागण्या मान्य : टीडीएस न वगळता थकबाकी मिळणार
स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ
रेल्वे स्थानकातील पंखे ‘कव्हर’बंद
चालकाच्या निष्काळजीमुळे महिला जखमी
पनवेलमध्ये लवकरच जाहिरात धोरण

आणखी वाचा