Suicide committed by the prison, punishment for the assault was found in jail | तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा
तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा

नवी मुंबई- घणसोली येथे राहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला असून रात्री उशिरा उघडकीस आला. सागर पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे. 

घणसोली सिम्प्लेक्स येथे सागर सहकुटुंब राहत होता. काही महिन्यांपूर्वी परिसरात झालेल्या दोन गटातील मारामारीच्या गुन्ह्यात त्यालाही अटक झाली होती. या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी तो तुरुंगातून सुटला होता. त्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर घरात कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 
 


Web Title: Suicide committed by the prison, punishment for the assault was found in jail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.