संत गाडगेबाबा उद्यान दुरूस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 02:50 AM2018-05-20T02:50:40+5:302018-05-20T02:50:40+5:30

प्रवेशद्वाराची डागडुुजी : ज्वेल आॅफ नवी मुंबईतील ‘हिरा’ही उजळला

Start of repair of Sant Gadgebaba Garden | संत गाडगेबाबा उद्यान दुरूस्तीला सुरुवात

संत गाडगेबाबा उद्यान दुरूस्तीला सुरुवात

Next

नवी मुंबई : शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या नेरुळ येथील संत गाडगेबाबा उद्यानाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली आहे. तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पामबीच रोडवरील हिऱ्याच्या प्रतिकृतीमधील विद्युत पुरवठाही पूर्ववत सुरू केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुरस्काराच्या रकमेमधून नेरुळमध्ये आयुक्त बंगल्याच्या बाजूला संत गाडगेबाबा उद्यानाची निर्मिती केली आहे. कमी खर्चात अत्यंत चांगले उद्यान बनविण्यात आले असून, आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उद्यानाला भेट दिली आहे. शाळांना सुट्टी पडल्यापासून उद्यानाला भेट देणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे. उद्यानामध्ये जाणाºया नागरिकांनी तेथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. उद्यानाचे प्रवेशद्वार व तिकीट खिडकीची रूम धोकादायक झाली आहे. आतमधील लहान मुलाच्या पुतळ्याचा हात तुटला आहे. धबधबा कोरडा झाला आहे सर्व तळ्यांमधील कारंजे आटले आहेत. कॅफेटेरीया अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. येथील समस्यांविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल प्रशासनाने घेतली आहे. उद्यानामध्ये धोकादायक ठरलेल्या प्रवेशद्वाराची दुरुस्ती सुरू केली आहे. उद्यानामधील इतर कामे करण्यासाठीचा पाठपुरावाही सुरू केला आहे.
पामबीच रोडवरील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमधील हिºयाच्या प्रतिकृतीमधील विद्युत पुरवठाही अनेक दिवसांपासून बंद होता. नागरिकांनी प्रशासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतरही विद्युत पुरवठा सुरू केला जात नव्हता. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध करताच तत्काळ विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे. हिरा पूर्ववत उजळल्यामुळे नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

स्थायी समितीमध्ये पडसाद
संत गाडगेबाबा उद्यानाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद स्थायी समितीमध्येही उमटले. भाजपा नगरसेवक सुनील पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याचे हात तुटले आहे. कारंजे बंद आहेत. धबधबा बंद आहे. दुरवस्थेविषयी गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Start of repair of Sant Gadgebaba Garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.