पनवेल मनपा हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:37 AM2018-01-16T01:37:37+5:302018-01-16T01:37:39+5:30

शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे.

Start of clean ward tournament in Panvel NMC | पनवेल मनपा हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेला सुरुवात

पनवेल मनपा हद्दीत स्वच्छ प्रभाग स्पर्धेला सुरुवात

googlenewsNext

पनवेल : शासनाचे स्वच्छ भारत अभियान देशात जोरदार सुरू आहे. या अंतर्गत यावर्षी देशभर स्वच्छ सर्वेक्षण २0१८ सुरू आहे. यामुळे देशातील शहरांचे रँकिंग ठरणार आहे. यामुळे पनवेल शहर सुद्धा रँकिंगमध्ये मागे पडू नये म्हणून शासनाने सुद्धा स्वच्छ वॉर्ड स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिकेत देखील प्रभागनिहाय स्वच्छता उपक्र म करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पालिका प्रशासनासोबत नगरसेवक देखील या उपक्र मात सहभागी झाले असून १४ रोजी विविध प्रभागात यासंदर्भात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रोहिंजण, पेंधर, नावडे व कामोठे भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी देखील या अभियानात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, ज्ञानेश्वर पाटील हे सहभागी झाले होते.
रस्त्यावर पडलेला कचरा उचलून, दर्शनीय भाग असलेल्या भिंतीवर रंगकाम करून स्वच्छतेचा संदेश यावेळी देण्यात आला. खारघर शहरात देखील हा उपक्र म राबविण्यात आला. भाजपा नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी, समीर कदम, किरण पाटील, गीता चौधरी, गुरु नाथ म्हात्रे, वासुदेव पाटील, दीपक शिंदे, पालिका विभाग अधिकारी श्रीराम हजारे, अनिल कोकरे, आदींनी या उपक्र मात सहभाग घेत भित्तिचित्रे काढली. यावेळी स्वच्छतेचा संदेश देत, प्लास्टिकचा वापर टाळा, बेटी पढाओ बेटी बचाओ असे संदेश स्वत: भिंतीवर लिहून नागरिकांना विविध सामाजिक संदेश दिले.
पनवेलमध्ये देखील प्रभाग क्र मांक १८ मध्ये विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी १५ रोजी उपक्र म हाती घेतला आहे. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.
पनवेल महानगर पालिकेत एकूण २० प्रभाग आहेत. स्वच्छ प्रभाग स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकाविणाºया त्या प्रभाग नगरसेवकाला पालिका सन्मानित करणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी पनवेल महानगर पालिका सज्ज झाली आहे.

Web Title: Start of clean ward tournament in Panvel NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.