सायन-पनवेल महामार्ग बनलाय अपघातांचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 01:53 AM2018-07-15T01:53:55+5:302018-07-15T01:54:09+5:30

सायन-पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे.

Sion-Panvel Highway Accidental Accident | सायन-पनवेल महामार्ग बनलाय अपघातांचा अड्डा

सायन-पनवेल महामार्ग बनलाय अपघातांचा अड्डा

googlenewsNext

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. अनेक महिन्यांपासून वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवेही बंद असून, त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईत येण्यासाठी सायन - पनवेल हाच प्रमुख मार्ग आहे. या रोडवरून रोज दोन लाख वाहनांची ये - जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केले. विस्तारीकरणासाठी ठेकेदाराने केलेला खर्च भरून काढण्यासाठी खारघरमध्ये ६ जून २०१५ रोजी टोलनाकाही सुरू केला आहे; परंतु ठेकेदाराने कामे पूर्ण केली नाहीत व नवीन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महामार्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दीड वर्षामध्ये महामार्गाने १०५ बळी घेतले आहेत.
वाशी ते कळंबोलीदरम्यान २० किलोमीटर रोडवरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. दीड वर्षामध्ये २५०पेक्षा जास्त अपघात होऊन १०५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक अपघात रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे झाले आहेत. उरण फाटा येथे ९ जुलैला अंधारामुळे टँकर १०० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली होती. तुर्भे येथेही अंधारामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत.
>पालकमंत्र्यांनी दिले आदेश
सायन - पनवेल महामार्गावर अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती. अधिकाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांनाही याविषयी माहिती देता आली नाही. शिंदे यांनी याविषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.
>येथे होतात अपघात
सानपाडा उड्डाणपूल, तुर्भे शरयू हुंडाई शोरूमसमोरील रस्ता, शिरवणे पूल, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपूल, कळंबोली या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
>दीड वर्षातील अपघातांचा तपशील
ठिकाणी अपघात मृतांची
संख्या
पनवेल ३९ १४
कळंबोली १८ ०९
खारघर ५० २५
बेलापूर - १८ ०७
नेरूळ - ३५ १५
सानपाडा- ०८ १२
वाशी - ७६ १३

Web Title: Sion-Panvel Highway Accidental Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.