सायन - पनवेल महामार्गावर कारला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:54 PM2019-07-18T23:54:15+5:302019-07-18T23:54:23+5:30

सायन - पनवेल महामार्गावर बेलापूर खिंडीत कारला अपघात झाला.

Sion - Accident on Caravan Highway on Panvel Highway | सायन - पनवेल महामार्गावर कारला अपघात

सायन - पनवेल महामार्गावर कारला अपघात

Next

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर बेलापूर खिंडीत कारला अपघात झाला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला असून, दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या वॅगन आर कारवरील चालकाचा ताबा सुटला. कार उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे चालक शैलेश सोळंखी याचा जागीच मृत्यू झाला आहे.
कारमधील दुसरा प्रवासीही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघात झाल्यानंतर नेरुळ अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृत चालक व जखमीला तत्काळ रुग्णालयात नेले. याविषयी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत सायन-पनवेल महामार्गावर अनेक अपघात झाले असून खड्डे, तसेच अतिवेगामुळे ताबा सुटल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास येत
आहे.

Web Title: Sion - Accident on Caravan Highway on Panvel Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.