प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:36 AM2018-06-22T02:36:47+5:302018-06-22T02:36:47+5:30

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून तालुक्यातील गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ गडाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

Settlement with Prabalgad on Gadheshwar, Morbe dam area | प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त

प्रबळगडसह गाढेश्वर, मोरबे धरण परिसरावर बंदोबस्त

Next

- मयूर तांबडे 
पनवेल : पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून तालुक्यातील गाढेश्वर धरण, मोरबे धरण, माची प्रबळ गडाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गाढेश्वर, मोरबे धरण तसेच माची प्रबळ गडावर २५ पोलीस कर्मचारी व ३ पोलीस अधिकाºयांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून मद्यपी व मद्य घेऊन जाणारे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येणाºया पावसाळी पर्यटकांची संख्या मोठी असल्याने या भागात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना अथवा दुर्घटना घडू नये यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी या भागात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. त्याचप्रमाणे पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येणाºया पर्यटकांसाठी ठिकठिकाणी खास सूचना फलक लावून सदर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले, स्त्रिया व ज्या लोकांना पोहता येत नाही, अशा लोकांनी पाण्यात उतरू नये. गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे सदर नदीपात्रात उतरून त्यात कोणतेही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये. सदर परिसरात अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई आहे. तसेच अमली पदार्थ, दारू अथवा तत्सम मादक द्रव्य बाळगताना अगर पिताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हा परिसर डोंगराळ असून रस्ते अरु ंद आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, अ‍ॅम्ब्ल्युलन्स यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता खुला रहावा यासाठी रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा तºहेने रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अन्यथा अशा वाहनचालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. याशिवाय येथे वर्षा सहलीसाठी येणाºया पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा. तसेच नशा करून वाहन चालवू नये, तसे आढळून आल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. जनतेच्या जीविताच्या व सुरक्षेच्या दृष्टीने गाढेश्वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा परिसरामध्ये पावसाळी पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.
धरणाच्या परिसरात पर्यटकांना जाऊ दिले की ते पाण्यात उतरतात. काही दुर्घटना घडली की त्याचा पोलिसांना दोष दिला जातो. त्यामुळे दर शनिवार आणि रविवारी गाढेश्वर धरण परिसरात, मोरबे धरण, माची प्रबळकडे जाणाºया रस्त्याकडे, कर्नाळा किल्ल्याकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
>कारवाई सुरू
गाढेश्वर धरणाकडे मद्याच्या बाटल्या घेऊन जाणाºया एका वाहन चालकावर तालुका पोलिसांनी कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही पर्यटनस्थळी मद्यपान करणारे व गोंधळ करणाºयांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
माथेरानच्या डोंगराळ परिसरात पाऊस झाल्यास पाण्याच्या प्रवाहामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने व ते लगेच समजून येत नसल्याने काही लोकांचा यापूर्वी या नदीपात्रात बुडून मृत्यू होण्याच्या यापूर्वी काही दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी त्याबाबत दक्षता घ्यावी.
- अशोक राजपूत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
पनवेल तालुका

Web Title: Settlement with Prabalgad on Gadheshwar, Morbe dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.