पनवेलमध्ये प्लास्टिक साठा जप्त, टपाल नाक्यावरील गोडाऊनवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:48 AM2018-06-21T02:48:46+5:302018-06-21T02:48:46+5:30

पनवेल महानगर पालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे.

The seized of plastic stock in Panvel, the poster on Godavari of the postal block | पनवेलमध्ये प्लास्टिक साठा जप्त, टपाल नाक्यावरील गोडाऊनवर धाड

पनवेलमध्ये प्लास्टिक साठा जप्त, टपाल नाक्यावरील गोडाऊनवर धाड

Next

पनवेल : पनवेल महानगर पालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. प्लास्टिकचा अनधिकृत साठा करणाऱ्या दुकानदारांवर धाड टाकून ही कारवाई केली जात आहे. बुधवारी टपाल नाक्यावर प्लास्टिक पिशव्यांच्या गोदामावर धाड टाकून सुमारे १३00 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना अज्ञात व्यक्तीने टपाल नाका येथे मालाची गाडी खाली होत असल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीप्रमाणे बुधवारी सकाळी ९ वाजता अचानक मनपा पथकाने या गोदामावर धाड टाकली असता त्यांना हा प्लास्टिकचा मोठा साठा या गोदामात आढळला. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश साळवे, अधीक्षक भगवान पाटील, स्वच्छता निरीक्षक दौलत शिंदे, नरेंद्र आंबोलकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

Web Title: The seized of plastic stock in Panvel, the poster on Godavari of the postal block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.