पनवेलमध्ये आज रंगणार ‘सखी सन्मान सोहळा’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:54 AM2018-03-11T06:54:56+5:302018-03-11T06:54:56+5:30

समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मराठी सिनेतारका उपस्थित राहणार असल्याने सोहळा रंगतदार होणार आहे.

 'Sakhi Samman Sohala' to be held at Panvel today | पनवेलमध्ये आज रंगणार ‘सखी सन्मान सोहळा’  

पनवेलमध्ये आज रंगणार ‘सखी सन्मान सोहळा’  

Next

पनवेल - समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी मराठी सिनेतारका उपस्थित राहणार असल्याने सोहळा रंगतदार होणार आहे.
समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पनवेल महापालिकेतील कुणी अधिकारी असो, वा वडापावची गाडी चालवून मुलीला पायलट बनवणारी माता, कोणी शिक्षण क्षेत्रात दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारी आदर्श शिक्षिका असो वा क्रीडा,
सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाºया महिलांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.
सन्मान सोहळ्याला डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटाच्या निर्मात्या व दिग्दर्शिका समृद्धी पोरे, अभिनेत्री व अँकर अनुपमा ताकमोगे, अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे, मधुरा वेलणकर-साटम उपस्थित राहणार आहेत. या वेळी तिन्ही अभिनेत्रींबरोबर अनुपमा ताकमोगे या संवाद साधणार आहेत. या वेळी प्रेक्षकांनाही प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय नृत्याविष्कार पाहाण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
ओरियन मॉलचे मंगेश परु ळेकर, मानसी परुळेकर, आमदार मंदा म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सखी सन्मान सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत व ओरियन मॉलतर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  'Sakhi Samman Sohala' to be held at Panvel today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.