रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 06:54 AM2018-12-16T06:54:31+5:302018-12-16T06:54:36+5:30

प्रकल्पग्रस्तांची फसवणूकीचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

Reliance has been accused of 'MNS' break, project-related fraud | रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

googlenewsNext

पालघर : रिलायन्स गॅस पाईपलाइन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्ताना सर्वोच्च मोबदला व प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे तसेच वर्सोवा पूल संदर्भात प्रशासकीय स्तरावर त्वरित धोरणात्मक निर्णय घेण्या बाबत गुरु वारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. या प्रकरणी मनसेने शड्डू ठोकल्याने आगामी काळात खळखट्याक आंदोलनाची सुरुवात होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कंपनीने संबंधित प्रकल्पग्रस्तांना रु पये ५९ हजार ८४० प्रती गुंठा देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. परंतु हा दर देण्यास रिलायन्स कंपनीने असमर्थता दाखिवल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले. तेंव्हा संखे यांनी संताप व्यक्त करीत ५९ हजार ८४० प्रती गुंठा दर ही आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकल्पग्रसतांना मान्य नसल्याचे सांगून, जर ही रिलायन्स कंपनी मनमानी पध्दतीने काम करणार असेल तर मनसे या कंपनीच्या अधिकाºयांच्या विरोधात उभी ठाकेल असे सांगितले. तसेच बाधित प्रकल्पग्रसतांना सर्वोच्च मोबदला देण्या संदर्भात शासनाची भूमिका कचखाऊ असल्याचा टोला संखे यांनी लगावला.
सर्वसामान्य जनतेला, वाहनधारकांना होणारा त्रास, वेळेचा होणारा अपव्यय आणि आर्थिक बाजू वाचेल अशी सर्व समावेशक भूमिका मनसेने घेत पालघर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. या बाबतीत प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून येत्या आठवड्यात शासन निर्णय अपेक्षित असल्याचे डॉ. नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर नजीक असलेल्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याचे कित्येक वर्षापूर्वी निदर्शनास येऊनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ डागडुजी करून वाहतूक सुरू ठेवण्याची मलमपट्टी शासन करीत असल्याची टीका जिल्हाध्यक्षानी केली. तसेच पुला संदर्भात कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रशासनाचा डाव कोणाच्या आर्थिक फायद्यापोटी खेळला जातोय का? अशी शंका संखे यांनी यावेळी व्यक्त केली.

वर्सोवा पुलाचे काम २५ डिसेंबरपर्यत पूर्ण
च्वर्सोवा पुला बाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विलंब होत असल्याचे मान्य करून, येत्या पंधरा दिवसात याबाबतीत सुरू असलेले काम २५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

च्यावेळी शिष्टमंडळात मनकासेचे जिल्हा सचिव अनंत दळवी, तलासरी अध्यक्ष सुनील ईभाड, पालघर अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, शहर अध्यक्षा गीता संखे उपस्थित होते.

Web Title: Reliance has been accused of 'MNS' break, project-related fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.