वसई : जमैकाची राजधानी असलेल्या किंग्स्टन येथे गेल्या गुरुवारी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बळी पडलेल्या राकेश तलरेजाच्या पार्थिवावर वसईत शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पार्थिव आणण्यासाठी महापौर प्रविणा ठाकूर यांनी परराष्ट्रमंत्री स्वराज व जमैकाच्या पंतप्रधानांची संपर्क साधला होता. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ब्रिटीश एअरवेजच्या कार्गो विमानाने राकेशचे पार्थिव मुंबईच्या विमानतळावर आणण्यात आला. यावेळी राकेशचे वडिल प्रकाश, मोठा भाऊ महेश तलरेजा विमानतळावर हजर होते. (प्रतिनिधी)