सायबर सिटीतही रुजतेय पब संस्कृती, : महाविद्यालयीन तरु ण थिरकतात डान्स फ्लोअरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क on Mon, January 01, 2018 7:25am

सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार्ट्यांची जाहिरात करून अल्पवयीन शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना या पार्ट्यांच्या जाळ्यात ओढले जाते व बेकायदेशीर दारू व नशेली पदार्थांची विक्र ी करून यात विद्यार्थ्यांना अडकवले जात आहे.

- प्राची सोनवणे नवी मुंबई : सांस्कृतिक व शैक्षणिक शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या नवी मुंबईत सध्या रेव्ह पार्टी, डीजे पार्टी, हुक्का पार्टी, डिस्को पार्टी, पूल पार्टीचे पेव फुटले असून, नवी मुंबईत पब संस्कृती उदयास येत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या सोशल मीडियामार्फत अशा पार्ट्यांची जाहिरात करून अल्पवयीन शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांना या पार्ट्यांच्या जाळ्यात ओढले जाते व बेकायदेशीर दारू व नशेली पदार्थांची विक्र ी करून यात विद्यार्थ्यांना अडकवले जात आहे. पब संस्कृती ही आजच्या आधुनिक मानसिकतेची गरज बनली असली, तरी मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील मूळ रहिवास असणारा समाज म्हणजे आगरी कोळी. आगरी कोळी संस्कृतीमुळे नावारूपाला आलेल्या नवी मुंबई शहरात सध्या नाइट लाइफ उदयास आली आहे. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरु णाईकडून वेगवेगळ्या पार्ट्यांचे प्लॅन आखण्यात आले असून, यामध्ये पब संस्कृतीला अधिक प्राधान्य दिले जाते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डान्स-गाण्यांवर धमाल करत, मौज-मस्तीचे नियोजन झाले असून, त्यासाठी शहरात विविध ठिकाणी डान्स फ्लोअर सज्ज झाले आहेत. शहरातल्या अनेक भागात तरु णांना आकर्षित करण्यासाठी विविध पब आणि हॉटेल्सकडून आकर्षक आॅफर्स दिल्या जात असल्याने तरुणांमध्ये याचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या न्यू ईयर सेलिब्रेशनला तरु णाई ‘चिल’ होण्यासाठी पब सारखे पर्याय निवडत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नवी मुंबईमध्येही नाइट लाइफ पाहावयास मिळत आहे. अख्खी रात्र सेलिब्रेशन करायचा ट्रेंड वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील अनेक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असलेले पब्स तरु णांना आकर्षक आॅफर देत आहेत. त्यामध्ये कपल आॅफर्स, ग्रुप आॅफर्स, पार्टी विथ लिकर अ‍ॅण्ड डीनर अशा अनेक प्रकारच्या आॅफर्स आहेत. त्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या सवलती हॉटेलांनी देऊ केल्या आहेत. त्यामुळे थर्टीफर्स्टची संपूर्ण रात्र एन्जॉय करण्यासाठी पबमधील बुकिंग आठवड्याभरापासूनच फुल्ल आहेत. पबमधील पार्टीमध्ये कॉलेज तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून, या वयोगटात अमली पदार्थांचे सेवन, व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नवी मुंबईसारख्या शहरामध्येही अनधिकृत पब्स सुरू करण्यात आले असून, सेलिब्रेशनसाठी मुंबईकडे वळणारी पावले आता नवी मुंबईकडे वळू लागली आहेत. बॉलिवूड नाइट, डिस्को, जॅझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स अशा तरु णांना थिरकायला लावणाºया विविध संगीत प्रकारांवर आधारित गाणी पबमध्ये वाजविली जातात. रात्री ८ वाजता पार्टी सुरू झाली की, अगदी पहाटेपर्यंत सलग स्पीकरवर वाजत राहतील एवढी गाण्यांची तयारी पब्स चालकांकडून केली जाते. विविध प्रकारच्या गाण्यांच्या हँगओव्हरमध्ये झिंगण्यासाठी शहरातील डान्स फ्लोअर गेल्या महिन्याभरापासून तयारीला लागले होते. बॉलिवूड नाईट, डिस्को, जॅझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स अशा तरु णांना थिरकायला लावणार्या विविध संगीत प्रकारांवर आधारित गाणी पबमध्ये वाजविली जातात . रात्री आठ वाजता पार्टी सुरू झाली की अगदी पहाटेपर्यंत सलग स्पीकरवर वाजत राहतील एवढी गाण्यांची तयारी पब्स चालकांकडून केली जाते.विविध प्रकारच्या गाण्यांच्या हँगओव्हरमध्ये झिंगण्यासाठी शहरातील डान्स फ्लोअर गेल्या महिन्याभरापासून तयारीला लागले होते. नाईट लाईफमुळे नवी मुंबईही आता रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पहायला मिळते. नाईट लाईफला पाठिंबा देताना सर्वात मोठा धोका आहे, तो महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा. रात्रभर तरु णाई आण िलोक मौजमजा करणार आण िएकाही तरु णीवर अथवा महिलेवर अतिप्रसंग अथवा बलात्कार होणार नाही, शहरातील पोलीस तसेच प्रशासन देणार का? अशा बिकट परिस्थितीत रात्रीच्या अंधारात किती गंभीर घटना घडू शकतात.

संबंधित

वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी
सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरवस्था
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षाखेरीस गणवेश
‘नैना’ क्षेत्रात अतिक्रमणाचा धडाका
खारघरमध्ये गाई चोरीच्या घटनांत वाढ

नवी मुंबई कडून आणखी

मोरबे धरणग्रस्त गावांतील कामे नवी मुंबई महापालिका करणार
विनाचर्चा ५०० कोटींच्या कामांना मंजुरी
बाजार समितीशी शेतकऱ्यांचा थेट संपर्क कमीच
पाणीप्रश्नावरून नागरिकांचा पनवेल पालिकेवर मोर्चा
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, स्कूलबसचालकांकडून नियमांची पायमल्ली

आणखी वाचा