पालिकेत ५२६ कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:21 AM2019-01-18T00:21:09+5:302019-01-18T00:21:19+5:30

नवी मुंबईत होणार अद्ययावत तरण तलाव : नेरूळमध्ये सायन्स पार्कही उभारण्यात येणार

Proposal of Rs 526 crores in the corporation | पालिकेत ५२६ कोटींचे प्रस्ताव

पालिकेत ५२६ कोटींचे प्रस्ताव

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल ५२६ कोटींंचे प्रस्ताव मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत. यामध्ये वाशीमध्ये बसडेपो, तरण तलाव उभारण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. वंडर्स पार्कच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सायन्स पार्क उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी विमा योजनेपासून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावांचाही समावेश आहे.


शहरात विकासकामे वेगाने होत नसल्याबद्दल डिसेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनी विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त रामास्वामी एन. यांनी शहरात सुरू असलेल्या कामांची यादीच सभागृहात सादर केली होती. जानेवारी महिन्याच्या सभेमध्ये तब्बल ५२६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. वाशी सेक्टर १२ मधील भूखंड क्रमांक १९६ व १९६ ए या ठिकाणी बसस्थानक, वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल व आॅलिंपिक आकाराचा जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. नेरूळ सेक्टर १९ ए मधील वंडर्स पार्कमध्ये सायन्स पार्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. कॅमेरे बसविण्यासाठी १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत.


प्रकल्पग्रस्त मुलांना वैद्यकीय व इतर उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. पालिका कार्यक्षेत्रात रात्र कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणार आहेत. बेलापूरमधील गौरव म्हात्रे केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा प्रस्तावही तयार केला आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विमा कवच
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा २०१९ - २० ते २०२४ - २५ या वर्षासाठी अपघात विमा उतरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास ३ लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास २ लाख व अपघातामधील वैद्यकीय खर्चासाठी ८० हजारपर्यंत विमा लाभ प्रस्तावित केला आहे.

Web Title: Proposal of Rs 526 crores in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.