पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 07:48 PM2017-12-15T19:48:02+5:302017-12-15T20:36:09+5:30

अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत .

Panvel: What is the correspondence between Ashwini Bidre and Kurundkar? | पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ? 

पनवेल : अश्विनी बिद्रे कडे सापडलेल्या पत्राचे कुरुंदकरशी संबंध काय ? 

Next
ठळक मुद्देपत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट नमुद पनवेल न्यायालयाने दोन्हीही आरोपीना १९ डिसेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी 

वैभव गायकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : बेपत्ता अश्विनी बिद्रे प्रकरणात नवीन नवीन गोष्टी पोलीस तपासात उघड होत आहेत . या प्रकरणात अभय कुरुंदकर आणि राजू पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे . आज शुक्रवारी पनवेल न्यायालयाने दोन्हीही आरोपीना १९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . मात्र या प्रकरणात अश्विनी बिद्रे यांनी लिहलेले पत्र पोलिसांच्या हाती लागेल असून त्या पत्रात माझे हात पाय तोडून मला ठार करण्याची तुझी ईच्छा पूर्ण होवो असे स्पष्ट पणे लिहले आहे . या पत्राचे आणि कुरुंदकरचे काय संबधीत आहे ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत . 
कुरुंदकर पोलीस अधिकारी असल्याने या प्रकरणात पोलीस तपासात विविध अडथळे निर्माण होत आहेत . अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी देखील हि माहिती आज पत्रकारांना दिली . दिड वर्षांपासून अभय कुरुंदकर संशयित आरोपी  असताना त्याचे नावे २०१७ च्या राष्ट्रपती पदकासाठी कसे काय पुढे येते ? याबाबत देखील गोरे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले . पोलिसांनी देखील या प्रकरणातील अधिक तपासासाठी न्यायालयासमोर विविध बाजू मांडल्या आहेत . या प्रकरणी संशयित आरोपींची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली आहे . 
या प्रकरणात कुरुंदकर पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याचे उघड झाले आहे . अद्याप या प्रकरणाचा काहीच छडा लागत नसून ज्या दिवसापासून अश्विनी बेपत्ता आहेत .ठाणे रेल्वे स्थानकावर कुरुंदकर यांची भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे . यावेळी  काही वेळ कुरुंदकर,बेपत्ता अश्विनी बिद्रे  व राजू पाटील यांचे मोबाईल लोकेशन एकच परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
 

Web Title: Panvel: What is the correspondence between Ashwini Bidre and Kurundkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.