मद्यविक्री केंद्राबाहेरचे पदपथ बनले ओपन बार, कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:03 AM2019-03-18T05:03:48+5:302019-03-18T05:04:39+5:30

उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

 Open runway outside the Liquor center, ignored the action | मद्यविक्री केंद्राबाहेरचे पदपथ बनले ओपन बार, कारवाईकडे दुर्लक्ष

मद्यविक्री केंद्राबाहेरचे पदपथ बनले ओपन बार, कारवाईकडे दुर्लक्ष

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांच्या उदासीनतेमुळे शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांना ओपन बारचे स्वरूप आले आहे. मद्यविक्री केंद्राबाहेरच तळीरामांच्या दारू पार्ट्या रंगत असल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर तळीरामांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
केवळ महसूल मिळवण्याच्या हव्यासापोटी उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्री केंद्र चालकांना नियमांची पायमल्ली करण्यात सूट मिळत असल्याचे दिसून येत आहे. मद्यविक्री केंद्राच्या ठिकाणी बेधडकपणे नियमांची पायमल्ली होत असतानाही कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. बारमध्ये बसून पिण्यावर होणारा पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मद्यविक्री केंद्र चालकांकडून ही शक्कल लढवली जात आहे. याकरिता स्थानिक राजकारण्यांसह पोलिसांना हाताशी धरून अर्थपूर्ण हितसंबंध जोपासले जात असल्याचाही आरोप होत आहे.
कोपरी येथील सिग्नलपासून काही अंतरावरच असलेल्या मद्यविक्री केंद्राबाहेर तळीरामांची गर्दी झालेली असते. त्यांच्याकडून रस्त्यालगतच वाहने उभी करण्यात येत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या सदंर्भातील अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांकडून कारवाईकडे होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे. अशाच प्रकारे कोपरखैरणे रेल्वेस्थानकाबाहेर पश्चिमेला बारच्या बाहेर रस्त्यावरच वाहने उभी करून मद्यपान केले जाते. यामुळेही त्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, त्यातून वाद उद्भवत आहेत. तर नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील अभुदय बँक लगत व स्थानकाच्या इमारतीमध्ये पश्चिमेकडील भागात आडोशाच्या जागी दिवस-रात्र उघड्यावर मद्यपान केले जाते. यामुळे त्या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर सीबीडी येथील प्रभात सेंटर इमारतीच्या तळाशी बोळामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ओपन बार चालत आहे.

कायदा व सुव्यवस्थेला धोका

शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवायांचा धडाका सुरू आहे. याकरिता अवैध मद्यवाहतूक, साठा करणाऱ्यांवर तसेच शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाया सुरू आहेत.

उघड्यावर मद्यपान करणाºया व त्यांना मुभा देणाºया मद्यविक्रेत्यांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अशा ठिकाणी राजकीय वैमनस्यातून वाद उद्भवून कायदा
व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होऊ शकतो.

मद्यविक्री केंद्रांना अभय : बहुतांश मद्यविक्री केंद्राचे मालक हे आजी-माजी पोलीस अधिकारी किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारण्यांशी संबंध असणाºयांचे आहेत. यामुळे सर्वांचीच मिलीभगत साध्य करून ठोस कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर एखाद्याने तक्रारीत सातत्य ठेवल्यास त्याच्यापुढे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो.

Web Title:  Open runway outside the Liquor center, ignored the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.