पनवेलमधील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:13 AM2018-07-01T01:13:28+5:302018-07-01T01:13:50+5:30

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या प्रतिनियुक्तीवरील नऊ अधिकाºयांच्या अखेर विविध पालिकांत बदल्या करण्यात आल्या आहेत.

 Nine officers transferred from Panvel | पनवेलमधील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पनवेलमधील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या प्रतिनियुक्तीवरील नऊ अधिकाºयांच्या अखेर विविध पालिकांत
बदल्या करण्यात आल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनाचे उपसंचालक द. गा. मोरे यांच्या सहीने बदल्यांची पत्रे सर्व अधिकाºयांना पाठविण्यात आली आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत ठरावीक अधिकाºयांना पालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, अशाप्रकारे ठराव करण्याचा अधिकार पालिकेला नसल्याचे शासनामार्फत सांगण्यात आल्याने या अधिकाºयांचीही बदली करण्यात आली आहे.
या नऊ पैकी चार अधिकाºयांना बदलीचे आदेश मिळाले आहेत.
या अधिकाºयांमध्ये रेश्मा करबेले, मनीषा कांबळे, सोमीनाथ तुपे,
स्नेहा वंजारी यांचा समावेश आहे.
तर अनिल जगदनी, गणेश साळवी, गजानन घरत, डॉ. भगवान
खाडे, निशांत औसरमळ या अधिकाºयांना अद्याप बदलीचे
आदेश प्राप्त झाले नसले, तरी त्यांचाही यात समावेश असल्याचे समजते. या अधिकाºयांच्या चिपळूण, रत्नागिरी, खोपोली, पेण, उरण, अंबरनाथ आदी वेगवेगळ्या नगरपरिषदांमध्ये बदली करण्यात आलेल्या आहेत. या सर्व अधिकाºयांनी पदग्रहण अवधी न उपभोगता पदस्थापना दिलेल्या नगरपरिषदेमध्ये २ जुलैला रु जू होऊन तसा अहवाल नगरपरिषद प्रशासन संचालनालयाला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मागील अनेक वर्षांपासून हे अधिकारी पनवेल नगरपरिषदेत कार्यरत होते. शासनाच्या नियमानुसार तीन वर्षांनी अधिकाºयाची
बदली करण्यात येते; परंतु हे संबंधित १० ते १२ वर्षांपासून येथेच तळ ठोकून होते.

अंतर्गत राजकारण भोवले
बदली झालेल्या नऊपैकी सहा अधिकाºयांना पालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात पालिकेत ठराव करण्यात आला होता. उर्वरित तीन अधिकाºयांचा यामध्ये समावेश नसल्याने या अधिकाºयांच्या अंतर्गत राजकारणाला सुरु वात झाली. यामुळे पालिकेत समाविष्ट नसलेल्या अधिकाºयांनी नगरपरिषद संचालनालयाकडे बदलीसंदर्भात अर्ज दाखल केले. त्यानंतर सर्वांच्याच बदल्या करण्यात आल्या.

Web Title:  Nine officers transferred from Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Transferबदली