नवी मुंबई : वर्षभरात ४५६१ गुन्हे, संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:22 AM2018-01-26T02:22:54+5:302018-01-26T02:23:03+5:30

पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Navi Mumbai: Number of 4561 crimes, number decreases over the year | नवी मुंबई : वर्षभरात ४५६१ गुन्हे, संख्या घटली

नवी मुंबई : वर्षभरात ४५६१ गुन्हे, संख्या घटली

googlenewsNext

नवी मुंबई : पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सलग तीन वर्षे गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. २०१५ मध्ये ५४०५ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ मध्ये ४८०१ व २०१७ मध्ये ही संख्या ४५६१ एवढी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २४० गुन्हे कमी दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी झाली ही दिलासादायक गोष्ट असली तरी गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण कमी होत असून ती पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. २०१६ मध्ये विक्रमी ७४ टक्के गुन्ह्यांचा उलगडा झाला होता. न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही ६० टक्के असे राज्यात सर्वात जास्त होते. परंतु २०१७ मध्ये प्रकटीकरणाची टक्केवारी ६७ झाली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
२०१६ च्या तुलनेमध्ये सोनसाखळीचे २६, घरफोडीचे ३९, चोरीचे ४६ व प्राणांतिक अपघाताचे ५७ गुन्हे कमी करण्यात यश आले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये दरोड्याचे ८ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये बँक आॅफ बरोडा व वाशीतील व्यापाºयाच्या घरावर झालेल्या दरोड्याचाही समावेश आहे. सर्व ८ गुन्हे उघडकीस आले असून ६५ टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २८ आरोपींना अटक केली आहे. तब्बल ५४ किलो ७४६ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. ४६५ ग्रॅम मेथाफेटामाईन हे केमिकल आंतरराज्य टोळीकडून जप्त केले आहे. पोलिसांनी वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ८ गुन्ह्यांमध्ये मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण ४६ आरोपींवर मोक्का लावला आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी २९ आरोपींना अटक केली आहे.
सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्ष
वर्षभरामध्ये सायबर सेल मध्ये ९५८ जणांनी तक्रारी केल्या होत्या. ७२ गुन्हे दाखल झाले असून २६ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. एकूण १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये रिलायन्स कंपनी व जेएनपीटीमधील जीटीआय पोर्टमधील संगणक हॅक केल्याचा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांचे संकेतस्थळही हॅक करण्यात आले होते.
दोषी पोलिसांवर कारवाई
कामात कुचराई करणाºयांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरामध्ये ७ कर्मचारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ५ अधिकारी, कर्मचाºयांनाही बडतर्फ केले असून एका व्यक्तीला सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. याशिवाय ७ जणांना बडतर्फीसाठी, १५ जणांना सेवेतून काढून टाकण्याची व दोघांना सक्तीने निवृत्तीची कारवाई का करू नये अशी नोटीस दिली आहे. याशिवाय एकूण ६० जणांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी आॅपरेशन मुस्कानअंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. १७ बालकांचा शोध घेतला आहे. ३ मुली व १७ महिलांची सुटका करून घेतली असून ३० आरोपींना अटक केली आहे.
वाहतूक पोलिसांनी वर्षभरामध्ये ४,०५,८१६ केसेस करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २०,२९२ जास्त केसेस केल्या आहेत. मद्यप्राशन करणाºया ५८८ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अपघात कमी करण्यात यश आले आहे.

Web Title: Navi Mumbai: Number of 4561 crimes, number decreases over the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.