शाब्दिक वादातून नवी मुंबई पालिका आयुक्तांचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 05:03 PM2019-02-20T17:03:14+5:302019-02-20T17:03:41+5:30

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या बुधवारी 20 फेब्रुवारी रोजी झलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधरण सभेत सभाग्रूह नेते रवींद्र ईथापे ...

Navi Mumbai Municipal Commissioner walk out | शाब्दिक वादातून नवी मुंबई पालिका आयुक्तांचा सभात्याग

शाब्दिक वादातून नवी मुंबई पालिका आयुक्तांचा सभात्याग

Next

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या बुधवारी 20 फेब्रुवारी रोजी झलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधरण सभेत सभाग्रूह नेते रवींद्र ईथापे यांनी प्रभागात कामे होत नसल्याचा आरोप करीत प्रशासनाला लखवा मारला आहे का? असा असंसदनीय शब्द वापरल्याने रागाने पालीका आयुक्त रामास्वामी एन यांनी सभागृह सोडले.

कामांसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला असल्याचे ईथापे म्हणाले त्यानंतर पालिका आयुक्तांनी पत्र प्राप्त झाल्यावर पहाणी केली असल्याचे सांगत गेल्या चार वर्षात ईथापे यांच्या प्रभागात केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. त्यानंतर ईथापे यांनी प्रभागात असलेल्या नाल्यालगतचा रस्ता  सिडकोने बनविला आसुन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा आयुक्त प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. त्यावर पालिका आयुक्तांनी हा रस्ता सिडकोने बनविला आहे. पालिकेने बनविला असल्याचे कोठेही म्हटले नसून अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे सांगत मी वन टू वन बोलत नसल्याचे आयुक्त म्हणाले व त्यानंतर आयुक्तांनी रागाने सभाग्रूह सोडले. त्यानंतर महापौर जयवंत सुतार यांनी सभग्रूहाचे कामकाज ज्याप्रकारे होत आहे ते चुकीचे असल्याचे सांगितले. आयुक्तांची मानधरणी करण्यासाठी महापौर आयुक्तांच्या दालनात गेले. त्यानंतर काही वेळाने अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील आल्यावर सभा सुरू झाली. यामुळे पुन्हा सत्ताधारी आणी प्रशासन यांच्यामधील वाद चहाट्यावर आला आहे.

Web Title: Navi Mumbai Municipal Commissioner walk out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.