सर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:29 AM2018-08-14T03:29:11+5:302018-08-14T03:48:43+5:30

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे.

 Navi Mumbai II in the best city | सर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर

सर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर

Next

नवी मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. २४ तास पाणीपुरवठा व सर्वोत्तम नागरी सुविधा देणाºया शहराला अजून एक बहुमान प्राप्त झाला आहे.
देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबईची यापूर्वीच निवड झाली आहे. यानंतर आता देशातील जगण्यायोग्य शहरामध्येही नवी मुंबई पुण्यानंतर दुसºया स्थानावर आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १११ शहरांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ‘फिजिकल, इन्स्टिट्यूशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल’ अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.
या चार निकषांमधील ‘इन्स्टिट्यूशनल’ निकषात गव्हर्नन्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, आॅनलाइन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबविणारे शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका प्रथम क्र मांकाचे शहर ठरले. यामध्ये जनतेला लाभदायक प्रशासकीय सेवा पुरविणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, तक्र ार निवारण प्रणाली नागरिकांना समाधानकारक अशा कालमर्यादित पद्धतीने राबविणे, अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशातील १११ शहरांमध्ये सर्वोत्तम ठरली.
‘फिजिकल’ निकषात गृहनिर्माण, मोकळ्या जागा, ऊर्जास्रोत, पाणीपुरवठा अशा बाबींचा समावेश होता. तसेच ‘सोशल’ निकषात शिक्षण व आरोग्य त्याचप्रमाणे ‘इकोनॉमिकल’ निकषात अर्थकारण व रोजगार अशा बाबींचा समावेश होता. या चार निकषांच्या अनुषंगाने देशातील १११ शहरांचे परीक्षण करण्यात आले. साधारणत: चार महिने केंद्र सरकारच्या परीक्षण समितीमार्फत कागदपत्रे तपासणी व प्रत्यक्ष भेटी याद्वारे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ५८.०२ गुणांकन प्राप्त करून देशातील द्वितीय क्र मांकाचे निवासयोग्य शहर म्हणून मानांकित ठरले. या क्र मवारीत नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा केवळ ०.०९ गुणांनी पुणे हे शहर पुढे असून (५८.११) त्यानंतर मुंबई, तिरु पती व चंदिगढ ही तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांकाची शहरे आहेत. या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. भविष्यातही नवी मुंबईमध्ये वास्तव्य करणाºयांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करूनदेण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

सोयी-सुविधा
स्वातंत्र्यानंतर स्वत:चे धरण विकत घेणारी देशातील एकमेव महानगरपालिका
२४ तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिका
घनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम यंत्रणा
अत्याधुनिक तंत्रावर आधारित डम्पिंग ग्राउंड
देशातील सर्वात उत्तम व अत्याधुनिक तंत्रावर आधारित मलनि:सारण केंद्र
खासगी व महापालिका रुग्णालयाचे विभागनिहाय जाळे
देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शहराची ओळख
देशातील सर्वात जास्त जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम असलेले शहर
रेल्वे व रस्त्यांच्या जाळ्यामुळे दळणवळणाची सर्वोत्तम सुविधा
एमआयडीसी, एपीएमसी व जेएनपीटीमुळे रोजगाराच्या
संधी
महापालिका क्षेत्रामध्ये १५६ उद्याने, ६७ मोकळ्या जागा, ८ ट्री बेल्टचा समावेश

नवी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पालिकेच्या स्थापनेपासून केलेल्या लोकाभिमुख कामांची ही पोचपावती असून हा सर्व सन्मान सर्व नवी मुंबईकरांचा आहे.
- जयवंत सुतार,
महापौर, नवी मुंबई


महानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यावर व दर्जा राखण्यावर विशेष भर देत आहे. देशातील द्वितीय मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस लाभले आहे. येथील जनतेचे राहणीमान उंचाविण्यासाठी महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.
- डॉ. रामास्वामी एन.,
महापालिका आयुक्त

महापालिकेला मिळालेले पुरस्कार
२००५ - ६ - संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये सन २००५ - ६ मध्ये प्रथम क्रमांक
सर्व शिक्षा अभियानामध्ये २००७ - ८ व २००८ - ९ मध्ये प्रथम क्रमांक
स्वच्छ भारत अभियान २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशात प्रथम क्रमांक
स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये २०१७ मध्ये राज्यात प्रथम व देशात ८ वा क्रमांक
५ मे २०१७ रोजी नागरी विकास दिनाच्या निमित्ताने कचरा विभाजनमधील उल्लेखनीय कामगिरीकरिता पुरस्कार
५ मे २०१७ मध्ये नागरी विकास दिनाच्या निमित्ताने सर्वाधिक करवसुलीकरिता पुरस्कार
महापालिका मुख्यालय हरित इमारत बांधकाम तत्त्वानुसार हुडकोचा २०१५ - १६ साठी पुरस्कार
जेसीबी क्लीन अर्थ या संस्थेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी उत्कृष्ट कामगिरीसाठी २०१५ चा पुरस्कार
ईपीसी वर्ल्ड मीडिया समूहाच्या वतीने क्षेपणभूमी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास २०१४ मध्ये पुरस्कार
२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरूस्ती सेवेबद्दल राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार
राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट नागरी आयसीटी पुरस्कार
पालिकेच्या अपंग विद्यार्थ्यांकरिता शिक्षण व प्रशिक्षणासाठी पुरस्कार
२०१० मध्ये संकलित पावसाळी पाणी निचरा पद्धतीकरिता राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार
२००९ मध्ये सांडपाणी व स्वच्छता सेवांमधील विकास कार्याकरिता सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार
२००९ मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाचा वसुंधरा पुरस्कार

Web Title:  Navi Mumbai II in the best city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.