नवी मुंबई : शहरात दररोज १००० किलो गुटखा विक्री, तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:54 AM2018-01-23T02:54:38+5:302018-01-23T02:54:55+5:30

गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.

Navi Mumbai: Everyday 1000 kgs of Gutka, smuggling racket activated in the city | नवी मुंबई : शहरात दररोज १००० किलो गुटखा विक्री, तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

नवी मुंबई : शहरात दररोज १००० किलो गुटखा विक्री, तस्करी करणारे रॅकेट सक्रिय

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : गुटखा खाल्ल्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व राज्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्य शासनाने जुलै २०१२ मध्ये राज्यात गुटखा विक्री, उत्पादन व साठा करण्यावर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाला साडेपाच वर्षे पूर्ण झाली असून सद्यस्थितीमध्ये गुटखा विक्री फक्त कागदावरच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई व पनवेलमधील ५ हजारपेक्षा पानटपरी व किराणा दुकाने व छोट्या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे गुटखा विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ, कांदा, बटाटा,मसाला व धान्य मार्केटमधील प्रत्येक पानटपरीवर सर्वांना दिसतील अशाप्रकारे गुटख्याच्या माळा लावून ठेवण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील विक्रेत्यांना गुटखा बंदीविषयी विचारले असता बंदी असली तरी सर्वत्र गुटखा मिळतो. पोलीस, एपीएमसी, एफडीएवाल्यांना खूश केले की कोणी कारवाई करत नसल्याचे सांगण्यात आले. सर्वांची परवानगी असल्यामुळेच गुटखा विकता येत असल्याचे उत्तर देण्यात आले. बाजार समितीमधील कामगार, व्यापारी व इतर घटकांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले असून त्यांना प्रत्येक पानटपरीवर सहजपणे हवा त्या ब्रँडचा गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे.
महाराष्ट्रामध्ये गुजरातवरून गुटखा विक्रीसाठी येत आहे. अहमदाबादमध्ये उत्पादन होत असलेल्या विमल गुटख्याची सर्वत्र चलती आहे. पाच रुपयांची विमलची पुडी ८ रुपयांना व १० रुपये किमतीची पुडी १५ रुपयांना विकली जात आहे. गोवा, राज कोल्हापुरी, सागर व इतर कंपनीचा गुटखाही सर्व पानटपरीवर विकला जात आहे. यावर त्याचे उत्पादन कुठे होते याची काहीही माहिती दिलेली नाही. आरएमडी गुटखा सर्वात महाग असून एका पुडीसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. गुजरातमधील अहमदाबादमधील बडोदा शहरात याची निर्मिती होत असून फक्त निर्यातीसाठी उत्पादित केला जाणारा हा गुटखा स्थानिक बाजारपेठेमध्ये विकला जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाºया गुटखा व्यवसायामध्ये माफियांचा समावेश आहे. गुटखा विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यांच्यावर पोलीस, अन्न व औषध प्रशासन, महापालिका व इतर कोणीही कारवाई करत नसल्याने त्यांचेच अभय असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
१५ टपºयांची मालकी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुन्ना, राकेश, राजाबाबू, दीपक हे चार जण पानटपºयांना गुटखा पुरविण्याचा व्यवसाय करत होते. या व्यवसायातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमविले आहेत. सद्यस्थितीमध्ये भाजी व फळ मार्केटमध्ये तब्बल १५ टपºया त्यांनी विकत घेतल्या आहेत. या टपºया परप्रांतीयांना चालविण्यास दिल्या असून त्यामधून रोज हजारो रुपयांची उलाढाल सुरू आहे. एपीएमसीच्या बाहेरही हे वितरक गुटखा पुरवत असून त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही.
पदपथावरही पानटपºया
एपीएमसीच्या भाजी मार्केटपासून विस्तारित मार्केटकडे जाणाºया रोडच्या सुरवातीला अनधिकृतपणे पानटपरी उभारण्यात आली आहे. याठिकाणी गुटखा विक्रीपासून खाद्यपदार्थ विक्रीही सुरू आहे. भाजी मार्केटच्या जावक गेटच्या बाहेरही पदपथावर पानटपरी सुरू केली आहे. फळ मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या गेटवरही पानटपरी सुरू असून सर्व ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सुरू असून त्यावर कोणीही कारवाई करत नाही.

Web Title: Navi Mumbai: Everyday 1000 kgs of Gutka, smuggling racket activated in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.