नवी मुंबई विमानतळास प्रगल्पग्रस्तांनी दिले दि. बा. पाटील यांचे नाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 12:13 PM2018-06-24T12:13:44+5:302018-06-24T12:14:05+5:30

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. 

navi mumbai airport is given name of d b patil | नवी मुंबई विमानतळास प्रगल्पग्रस्तांनी दिले दि. बा. पाटील यांचे नाव 

नवी मुंबई विमानतळास प्रगल्पग्रस्तांनी दिले दि. बा. पाटील यांचे नाव 

Next

- वैभव गायकर

पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या ५ व्या स्मृती दिनानिमित्त एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरीकृती समितीतर्फे रविवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या साईटवर जाऊन या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले. 

कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या पुढ़ाकाराने शिवक्रांती मावळा संघटना, स्थानिक मच्छिमार संघटनेच्या  पदाधिका-यांनी हा उपक्रम राबविला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, स्थानिक प्रकल्पग्रस्त संघटना दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आग्रही आहेत.

दरम्यान, आज विमानतळाच्या नामकरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमध्ये समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, शिवक्रांती संघटनेचे किरण केणी, मच्छिमार संघटनेचे राहुल कोली, चेतन ड़ाऊर, वसंत म्हात्रे, हरिश्चद्र म्हात्रे, राष्ट्रवादीचे नगसेवक सतिश पाटील, दापोली ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान घोपरकर, संतोष पाटील, पदम पाटील, भारत म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, कुंदन कड़ू, रविंद्र पाटील, निलकंठ पाटील आदि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 
 

Web Title: navi mumbai airport is given name of d b patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.