नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:11 AM2018-04-09T03:11:16+5:302018-04-09T03:11:16+5:30

शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत.

Naik's house, Bhujbal jail! | नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

नाईक घरी, भुजबळ तुरुंगात!

Next

नवी मुंबई : शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. गणेश नाईक घरी बसले, छगन भुजबळ तुरुंगात असून, नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. त्यांची स्थिती पाहून भविष्यात शिवसेना सोडण्याचा विचार कोण करणार नाही, अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पक्ष सोडणाºयांवर टीका केली.
नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये शिवसेना पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात बोलताना सुभाष देसाई यांनी भाजपावरही सडकून टीका केली. आतापर्यंत भाजपाच सत्तेवर येणार असल्याची भाषा करणारे आता एनडीए पुन्हा सत्ता मिळवेल, अशी भाषा वापरू लागले आहेत. भाजपाने आत्मविश्वास गमावला असून, आता त्यांना मित्रपक्षांची आठवण होऊ लागली आहे; परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली असून, येणाºया निवडणुकीमध्ये विधानभवनावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली आहे; परंतु शिवसेना अभेद्य असून, पक्षाला आव्हान देणाºयांचे अस्तित्वही दिसत नाही. सद्य:स्थितीमध्ये शिवसेना सोडणारे गणेश नाईक घरी बसले आहेत. छगन भुजबळ तुरुंगात गेले आहेत. नारायण राणे राज्यातून तडीपार झाले आहेत. संसदेमध्ये हिंदी व इंग्रजीत बोलावे लागते व बोलले जाते. यामुळे पुढील सहा वर्षे हिंदी व इंग्रजी शिकणे व समजून घेण्यातच त्यांचा वेळ जाईल, अशी टीका त्यांनी केली. आनंद परांजपे यांच्यासह अनेकांचे अस्तित्व संपले असून, त्यांची अवस्था पाहून भविष्यात कोणी शिवसेना सोडण्याचे धाडस करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसैनिक हे शिवसेनेची ताकद आहे. जोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत सेना अभेद्य राहणार आहे. शिवसैनिकांनी अनेक वेळा गणेश नाईक यांची मक्तेदारी संपविली आहे. यापुढेही ठाणे जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविला जाईल. ठाणेमध्ये क्लस्टर योजना राबविण्यासाठी १५ वर्षे संघर्ष केला. पाच वेळा विधानसभेत निलंबनाची कारवाई सहन केली. यानंतर क्लस्टर योजना अस्तित्वात आली. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टीसह इतर प्रश्न सोडविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मतभेद दूर करून पदाधिकाºयांनी संघटनेच्या कामामध्ये झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. उपनेते विजय नाहटा यांनी भाजपा हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यांच्याशी पुन्हा युती नको, अशी भूमिका व्यक्त केली. या वेळी खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला नामदेव भगत, विजय माने, मनोहर गायखे, हरिभाऊ म्हात्रे, संद्या वडावकर, रंजना शिंत्रे, रतन मांडवे, काशीनाथ पवार, मनोज हळदणकर,
ज्ञानेश्वर सुतार, गणपत शेलार,
समीर बागवान उपस्थित होते.
>मतभेद दूर करा
शिवसेना मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी विभाग अधिकाºयांपासून सर्व वरिष्ठ पदाधिकाºयांची बैठक घेतली. यामध्ये संघटनेमध्ये मतभेदावर अनेकांनी भाष्य केले. त्याचे पडसाद मेळाव्यात उमटले. मतभेद ठेवू नका. होर्डिंगवर कोणाचे फोटो लावले यावरून रुसण्यापेक्षा चांगले काम करण्यास प्राधान्य द्या, जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होऊन आंदोलन करा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Naik's house, Bhujbal jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.