बेकायदा होर्डिंगकडे पालिकेची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:26 AM2019-01-21T00:26:37+5:302019-01-21T00:26:43+5:30

पनवेल महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर फलक लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

 Lessons of illegitimate hoarding | बेकायदा होर्डिंगकडे पालिकेची पाठ

बेकायदा होर्डिंगकडे पालिकेची पाठ

Next

- मयूर तांबडे
पनवेल : पनवेल महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर फलक लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र यावर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पनवेल महापालिका स्थापन होऊन २७ महिने उलटून गेले आहेत. यादरम्यान केवळ एकावरच शहराचे विद्रूपीकरण केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. यावरून पालिकेचे अधिकारी बेकायदेशीर फलक लावणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात उदासीन असल्याचे दिसत आहे.
पनवेल पालिकेच्या हद्दीमध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व अन्य गावांचा समावेश होतो. सद्यस्थितीत महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात नववर्षाचे, तसेच होऊन गेलेल्या सणांचे फलक मोठ्या प्रमाणात लावलेले दिसून येत आहेत. मात्र पनवेल पालिका बेकायदेशीर फलक लावून शहर विद्रूप करणाºयाविरोधात कारवाई करताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात फलक लावलेले असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते.
पालिकेच्या वतीने गेल्या २७ महिन्यात केवळ डीम्पी अ‍ॅडर्व्हटाझिंग या एकावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे बेकायदेशीररीत्या फलक लावणाºया विरोधात गुन्हे दाखल करण्यास पालिकेचे अधिकारी धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.
पनवेल महापालिकेला आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१८ या २७ महिन्यात १ कोटी १४ लाख ९३ हजार २२८ रुपयांचा जाहिरात कर मिळालेला आहे. तर बेकायदेशीर फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाºयाकडून २ लाख ४५ हजार ५५० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला. या दरम्यान पालिकेतर्फे एकूण १ हजार ८४५ बेकायदेशीर फलक काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
अधिकृत फलक लावण्यासाठी परवानगी घेऊन पालिकेने ५७ मोठमोठे होर्र्डिंग्स उभारलेले आहेत. पालिकेने पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर असे चार पदनिर्देशित अधिकारी नियुक्ती केलेली आहे. अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी चार पदनिर्देशित अधिकाºयांवर आहे. असे असले तरी पालिका हद्दीत बेकायदेशीर फलक विद्रूपीकरण करणाºयाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना अधिकारी गुन्हे दाखल करत नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पालिकेचे अधिकारी अनधिकृत फलक लावणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात उदासीन असल्याचे दिसत आहे.
>मानधनातून वसुली करण्याच्या नोटिसा
पनवेल नगरपालिका असताना जाहिरात धोरण निश्चित नव्हते. महापालिकेचे जाहिरात धोरण निश्चित झाले आहे. व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. नगरसेवकांकडून बेकायदा फलक लावल्याबद्दल मानधनातून वसुली करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. महापालिका स्थापनेपासून पालिकेच्या अधिकाºयांनी केवळ एकावर शहर विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. यावरून पालिकेचे अधिकारी यांना बेकायदेशीर लावलेले फलक दिसत नाहीत. अधिकारी यावर कारवाई करत नसतील तर आयुक्तांनी अशा अधिकाºयांवर कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
>परिसरात विनापरवाना बॅनर लावले असतील तर पदनिर्देशित अधिकाºयांनी मालमत्ता विरु पण कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. यात हयगय केल्यास पदनिर्देशित अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका

Web Title:  Lessons of illegitimate hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.