पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात गुरुवारी सिडको भवनमध्ये सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी या बैठकीला माजी खासदार रामशेठ ठाकूर, खालचे ओवळे , वरचे ओवळे व वाघिवली पाडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. पुनर्वसनासंदर्भात गावकºयांनी आपल्या अटी यावेळी लवंगारे यांंच्या समोर मांडल्या,मात्र प्रकल्पग्रस्तांमध्येच एकजूट नसल्याचे या बैठकीत उडलेल्या खटक्यावरुन दिसून आले.
विमानतळबाधित शेतकºयांनी वेळोवेळी पुनर्वसनाच्या मुद्यावरून याठिकाणच्या कामाला विरोध दर्शविला आहे. उलवे टेकडीच्या सपाटीकरणाच्या कामाला विरोध दर्शवत तरघर, उलवे, कोंबडभुजे, कोल्ही कोपर आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी आज काम बंद आंदोलन केले. पुनर्वसनाच्या विविध अटीवरुन सिडको आणि ग्रामस्थांमधील संघर्ष अद्याप सुरुच आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांमध्ये देखील कुठेतरी एकजूट नसल्याचे दिसून येत आहे. सिडकोमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी पुनर्वसनासंदर्भात सिडकोने तीन महिन्यात सर्व अटी पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत स्थलांतरण नाही अशी भूमिका घेतली. स्थानिकांच्या मागणीला माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखील यावेळी पाठिंबा दिला. मात्र यावेळी चर्चा करीत असताना दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये उडालेल्या खटक्यावरुन सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे या बैठकीतून निघून गेल्या. त्यामुळे पुनर्वसनाच्या विविध विषयांवरुन ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
या बैठकीत ग्रामस्थांनी येथील गावांना पुराचा संभाव्य धोका, विविध संस्थांनी विमानतळ क्षेत्राचा केलेला सर्व्हे आदीबाबत सिडको अधिकाºयांशी चर्चा केली. सिडकोने तयार केलेले अहवाल वेबसाईटवर सार्वजनिक करण्याची मागणी केली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखील सिडकोने ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच सर्व कामे करावीत अशा सूचना यावेळी अधिकाºयांना केल्या.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.