क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:52 AM2018-02-20T01:52:05+5:302018-02-20T01:52:14+5:30

महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

Kshatriya Kaulavans Rajdhraj | क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

googlenewsNext

नवी मुंबई : महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवरायांना मानाचा मुजरा देत शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली होती.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास ब्रान्टो स्कायलिफ्ट या अत्याधुनिक वाहनाच्या साहाय्याने पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची उपस्थिती होती. महापालिका मुख्यालयातही अ‍ॅम्पीथिएटर येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात आले. नेरुळमधील गणपतशेठ तांडेल मैदानासमोरील परिसरात शिवजन्मोत्सव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बेलापूरमध्ये नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयकर कॉलनी परिसरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडदुर्गांच्या छायाचित्रांचे, शस्त्र व शिवकालीन नाणी यांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवत आणि या गडकोटांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी आपला कट्टा संस्था, श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड व नवी मुंबई महानगरपालिका, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी न.मुं.म.पा. शाळा क्र . ४८, से-८, ऐरोली येथे शिवस्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि काही दुर्मीळ अशा गडदुर्गांची छायाचित्रे तसेच शस्त्र संग्राहक सुनील कदम यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्र व प्रवीण मोहिते यांच्या संग्रहातील शिवराई व ब्रिटिश नाणी इथे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असून शहरातील शाळांनी भरघोस प्रतिसाद दिला. भारतीय टपाल विभागाने छत्रपती शिवरायांवर प्रकाशित केलेली काही टपाल तिकिटे व विशेष लिफाफे या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे प्रतिवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी होणाºया शिवराज्याभिषेक सोहळ्याची चित्रफीत दाखवण्यात आली. नव्या पिढीला इतिहासातील घटनांचा मागोवा घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Web Title: Kshatriya Kaulavans Rajdhraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.