शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:26 AM2019-02-20T03:26:18+5:302019-02-20T03:26:38+5:30

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवप्रेमी महिला, पुरुषांसह ...

Hailing from the city dwellers, | शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

शहरवासीयांनी दिली शिवरायांना मानवंदना

Next

नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवप्रेमी महिला, पुरुषांसह लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. तर अनेक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेच्या निघालेल्या पालख्यादेखील काढण्यात आल्या.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रहिवासी सोसायट्यांसह विविध मंडळांकडून दिवसभर लोकोपयोगी कार्यक्रमांसह पालखीचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पालिका मुख्यालयात देखील शिवाजी महाराज व संत रोहिदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
शहरातील विविध भागात शिवजयंती साजरी होत असताना, त्याची शिवज्योती वाशीतील चौकातून काढली जात होती. काही मंडळांकडून मोटारसायकल रॅली काढून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यात आला. त्याप्रमाणे घणसोली सिम्पलेक्स येथील ओमसाई धाम सोसायटीत देखील मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. तर घणसोली गावात एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी नुकतेच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. तर काही मंडळांनी शहिदांना श्रद्धांजली वाहून भव्य रॅली न काढता साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

दुंदरे येथे शिवरायांच्या अर्धाकृती स्मारकाचे प्रांतांच्या हस्ते अनावरण
पनवेल : तालुक्यातील दुंदरे येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे अनावरण पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रमेश पाटील, संदीप पाटील, मेजर भरत कर्नेकर, मेजर प्रवीण पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होता. छत्रपती शिवरायांचे शिल्प गावामध्ये असावे अशी दुंदरे येथील युवकांची इच्छा होती. गावातील संदीप पाटील या युवकाने स्वखर्चाने शिवरायांचे स्मारक गावामध्ये उभारले. त्याला शिव गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मदत केली. शिवजयंतीचे औचित्य साधून पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले यांच्या हस्ते या शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी मोटारसायकलवरून मिरवणूक काढण्यात आली. अ‍ॅड. विनोद शंकरराव चाट, नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे, शिवराज्य संकल्प संस्थेचे अध्यक्ष विवेक मोकल, पोलीस निरीक्षक एस.एस.पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून पोवाडे सादर
शिवजयंतीच्या निमित्ताने वाशीतील नवी मुंबई हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित भाषण व पोवाडे यांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक किसन पवार, साधना धस, ऋ चा परळकर, नीता गायकवाड आदी शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्र मांनी शिवजयंती साजरी
नेरु ळ सेक्टर २ मधील शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यामार्फत शिवजयंतीच्या निमित्ताने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच लहान मुले आणि महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.
 

Web Title: Hailing from the city dwellers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.