गुटखा विक्रेत्यांची झाडाझडती सुरू, पोलीस संयुक्त कारवाई करणार : तस्करी करणा-याचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:41 AM2018-01-24T02:41:31+5:302018-01-24T02:41:44+5:30

शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

 Gutkha dealers' plantation started, police will take joint action: smuggling scandal | गुटखा विक्रेत्यांची झाडाझडती सुरू, पोलीस संयुक्त कारवाई करणार : तस्करी करणा-याचे धाबे दणाणले

गुटखा विक्रेत्यांची झाडाझडती सुरू, पोलीस संयुक्त कारवाई करणार : तस्करी करणा-याचे धाबे दणाणले

Next

नवी मुंबई : शहरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शहरात खळबळ उडाली आहे. तस्करी करणा-यांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने कारवाई करण्याचे स्पष्ट केले असून बाजार समितीने गुटखा विकणाºया पानटपºयांचे परवाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
शासनाने जुलै २०१२मध्ये राज्यात गुटखा बंदी लागू केली आहे; परंतु हे आदेश धाब्यावर बसवून नवी मुंबई, पनवेल परिसरातील प्रत्येक पानटपरी, किराणा दुकान व चहाच्या स्टॉलवरही बिनधास्त गुटखा विकला जात आहे. ‘लोकमत’ने याविषयी स्टिंग आॅपरेशन प्रसिद्ध केल्याने सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. नवी मुंबईमधील विशेषत: मुंबई बाजार समितीमधील प्रत्येक टपरीवरून गुटखा विक्री बंद झाली आहे. दुकानदारांनी उपलब्ध साठा लपविला आहे. गुटखा विक्री करणारे व पुरवठा करणाºया वितरकांनी कारवाई टाळण्यासाठी धडपड सुरू केली आहे. दुकानदारांना फोन करून आमचे नाव सांगू नका, असे सांगितले जात होते. पोलिसांनी अनेक संशयितांना पोलीसस्टेशनला बोलावून चौकशी सुरू केली होती. वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीसस्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये गुटखा विकला जात असेल, तर तत्काळ कारवाई करा, असे आदेश दिले आहेत. गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकारी अन्न व औषध प्रशासनाकडे आहेत. यामुळे त्यांच्या मदतीने धाडी टाकण्यात येणार असल्याचे परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी स्पष्ट केले आहे.
एपीएमसी गुटखा तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील पानटपºयांवर गुटखा विक्री होत आहे. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने एपीएमसीत सर्व स्टॉल्सची झाडाझडती घेण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. ज्यांना स्टॉल्सचे वितरण केले आहे, तेच तेथे व्यवसाय करत आहेत का? याची तपासणी करण्यात यावी. ज्या स्टॉल्सवर गुटखा किंवा बेकायदेशीर वस्तूंची विक्री होत असल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ज्या स्टॉल्सवर गुटखा विक्री होत आहे त्यांचे परवानेच रद्द करण्यात येणार आहेत.

Web Title:  Gutkha dealers' plantation started, police will take joint action: smuggling scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.