भाजी, फळ मार्केटमध्ये गुटखा जप्त; पानटपरीचालकांवरही होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:05 AM2018-04-20T02:05:36+5:302018-04-20T02:05:36+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी व फळ मार्केटमधील अवैध व्यवसायाविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दोन्ही मार्केटमधून गुटखा जप्त केला आहे.

 Gutka seized in vegetable, fruit market; Action will take place on Panet pilots | भाजी, फळ मार्केटमध्ये गुटखा जप्त; पानटपरीचालकांवरही होणार कारवाई

भाजी, फळ मार्केटमध्ये गुटखा जप्त; पानटपरीचालकांवरही होणार कारवाई

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी व फळ मार्केटमधील अवैध व्यवसायाविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. दोन्ही मार्केटमधून गुटखा जप्त केला आहे. गुटखाविक्री करणाऱ्या पानटपरीचालकांवरही कारवाई करणार असून, अवैध व्यवसायिकांचे परवाने रद्द करणार आहेत.
‘एपीएमसीमधील समस्यांचा ‘फळ’बाजार!’ याविषयी वृत्त ‘लोकमत’ने १७ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. कचºयाच्या समस्येबरोबर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री केली जात असून, गांजा सेवन करणाºयांच्या मैफिली रंगत असल्याचेही पुराव्यानिधी दाखविण्यात आले होते. बाजारसमितीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश भाजी व फळ मार्केटमधील उपसचिवांना व सुरक्षा विभागाला दिले होते. भाजी मार्केटमधील सुरक्षा विभागाने तत्काळ दखल घेऊन कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मार्केटमधील पी-३४ या पानटपरीमधून गुटख्याच्या ४२५ पुड्या जप्त केल्या आहेत. आर-२१ या टपरीमधून २७० पुड्या जप्त केल्या आहेत. आर-३० मधून २१, पी-१५मधून १४०, २० नंबर स्टॉल्समधून २३४ पुड्या जप्त केल्या आहेत. सहाही पानटपºयांमधील माल जप्त करून पंचनामा केला आहे. कारवाईविषयी सविस्तर अहवाल मुख्य सुरक्षा अधिकाºयांमार्फत प्रशासकांकडे पाठविला आहे. फळ मार्केटमधील सुरक्षा विभागानेही चार पानटपºयांमधून गुटखा जप्त केला आहे. याविषयी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.
भाजी व फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयांनी गुटखा जप्त केला आहे; परंतु याविषयी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार सुरक्षा विभागाला नाहीत. अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाºयांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. यामुळे जप्त केलेल्या गुटख्याविषयी सविस्तर अहवाल पोलीस व अन्न औषध प्रशासनाला देणार आहे. गुटखाविक्री करणाºयांचा अहवाल एपीएमसीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी यांना दिला आहे. बंदी असलेल्या वस्तूंची विक्री केल्यास त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो.

पोलीस व एफडीएच्या कारवाईकडे लक्ष
गुटखाविक्री करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाचा आहे; परंतु ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एपीएमसीमध्ये कधीच फिरकत नाहीत. याशिवाय स्थानिक पोलीसस्टेशनकडूनही अधिकार नसल्याचे सांगून कारवाई करण्याकडे टाळले जाते. यामुळेच अवैध व्यवसाय करणाºयांचे मनोबल वाढत आहे.

कारवाई सुरूच राहणार : बाजारसमिती प्रशासनाने अवैधपणे गुटखाविक्री करणाºयांवर कारवाई सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जे स्टॉलधारक गुटखाविक्री करतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची नोटीस दिली जाणार आहे. यामुळे स्टॉलधारकांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title:  Gutka seized in vegetable, fruit market; Action will take place on Panet pilots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.