ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 03:07 AM2018-02-18T03:07:15+5:302018-02-18T03:08:40+5:30

Greenfield Airport in Navi Mumbai ... 21 Years of Hard Journey ... | ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

Next

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प खºया अर्थाने दृष्टिपथात आला आहे.
नवी मुंबई विमानतळ २२६८ हेक्टर जागेवर उभारले जात आहे. विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १६००० कोटी रुपये इतका आहे. राज्य शासन आणि सिडको भागीदार असलेल्या नवी मुंबई इंटनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात मैलाचे दगड ठरणाºया या प्रकल्पाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सर्व प्रथम ९१९७मध्ये या विमानतळाचा विचार पुढे आले. फेब्रुवारी १९९७मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या देशी गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विमानतळाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये या विमानतळाची उपयुक्तता आणि व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली. २००७मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली. त्यानंतर भूसंपादन, पुनर्वसन, आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आदीमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही २०१४पासून झाली. २०१६पासून विमानतळपूर्व कामाला सुरुवात करण्यात आली. तर २०१७मध्ये विमानतळाचा मुख्य ठेकेदार म्हणून जीव्हीके कंपनीची निवड करण्यात आली.

विमानतळाची वैशिष्ट्ये
स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई शहरात उभारले जात आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६0 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. रियल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत.

Web Title: Greenfield Airport in Navi Mumbai ... 21 Years of Hard Journey ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.