वेतनवाढीत प्राथमिक शिक्षकांचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:19 AM2018-01-19T01:19:42+5:302018-01-19T01:19:42+5:30

महापालिका प्रशासनाने बालवाडी शिक्षिका, मदतनीस, माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकांना वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

Graduation does not include primary teachers | वेतनवाढीत प्राथमिक शिक्षकांचा समावेश नाही

वेतनवाढीत प्राथमिक शिक्षकांचा समावेश नाही

Next

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने बालवाडी शिक्षिका, मदतनीस, माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकांना वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. १९ जानेवारीला होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. वेतनवाढीमधून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले आहे. ठोक मानधनावरील शिक्षकांनाही २० हजार रुपये मानधन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ५३ बालवाडी वर्ग व १७ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. यामध्ये ११६ बालवाडी शिक्षिका, १११ मदतनीस, ३२ माध्यमिक शिक्षक व ३१ शिक्षण सेवक कार्यरत आहेत. या सर्वांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता; परंतु सभा तहकूब झाल्यामुळे त्यावर निर्णय होवू शकलेला नाही. सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. महापालिका शाळांमध्ये २०११ पासून ठोक मानधनावरील शिक्षक कार्यरत आहेत. सुरवातीला ५ हजार रुपये मानधनावर या शिक्षकांनी विद्यादानाचे काम केले. शाळेतील साफसफाई कामगारांपेक्षाही त्यांना कमी वेतन देण्यात येत होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा व प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांना १२ हजार रुपये मानधन करण्यात आले आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये वाढलेले घरभाडे व महागाईमुळे या वेतनामध्ये घरखर्च चालविणे जवळपास अशक्य होत आहे. यामुळे प्रशासनाने माध्यमिक शिक्षक व शिक्षण सेवकाप्रमाणे २० हजार रुपये मानधन करावे अशी विनंती शिक्षकांनी केली आहे. याविषयी आयुक्तांसह लोकप्रतिनिधींनाही विनंती केली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Graduation does not include primary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.