नवी मुंबईत पुन्हा मुलीच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:47 AM2019-06-09T02:47:00+5:302019-06-09T02:47:18+5:30

दहावीचा निकाल जाहीर । शहराचा निकाल ८४ टक्के । २० शाळांचा निकाल १00 टक्के

Girlfriend in Navi Mumbai again tops | नवी मुंबईत पुन्हा मुलीच अव्वल

नवी मुंबईत पुन्हा मुलीच अव्वल

Next

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला.नवी मुंबई शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचे प्रमाण अधिक असून, मुलींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी नवी मुंबई शहराचा निकाल दरवर्षीपेक्षा कमी म्हणजेच ८४.५४ टक्के लागला असून, शहरातील सुमारे २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळामार्फत गेल्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम आणि प्रश्निपत्रिकेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले होते. याचा परिणाम राज्यासह नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर झाला आहे.

100
टक्के निकाल
लागलेल्या शाळा

सेंट मेरी स्कूल वाशी, फादर अग्नल मल्टिपर्पज स्कूल वाशी, सेक्रे ट हार्ट स्कूल वाशी, सेंट झेवियर्स स्कूल नेरुळ, नूतन मराठी विद्यालय नेरु ळ, एस. एस. हायस्कूल शिरवणे, विद्याभवन स्कूल नेरु ळ, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ऐरोली, एस. बी.ओ. ए. स्कूल नेरु ळ, टिलक इंटरनॅशनल स्कूल घणसोली, महिमा इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, एस. आर. मेघे विद्यालय ऐरोली, जी. जी. एज्युकेशन अ‍ॅकॅडमी नेरु ळ, शारदा विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, विश्वभारती स्कूल मराठी माध्यम नवी मुंबई, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल नेरु ळ

नोंदणीकृत विद्यार्थी
विद्यार्थी विद्यार्थिनी
८३८८ ७४०६
परीक्षार्थी विद्यार्थी
विद्यार्थी विद्यार्थिनी
८३४१ ७३७४
पास विद्यार्थी
विद्यार्थी विद्यार्थिनी
६४०१ ६४०७

पनवेलचा ८२ टक्के निकाल
पनवेल : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. पनवेल तालुक्याचा निकाल ८२.४५ टक्के लागला आहे. तालुक्यातील एकूण १०७२३ विद्यार्थ्यांची दहावीला नोंदणी झाली होती. त्यापैकी १०६६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्याचा दहावीचा निकाल ढासळला आहे. १२० शाळांपैकी केवळ दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटी, खांदा कॉलनी बार्न्स हायस्कूल पनवेल, कारमेल हायस्कूल कळंबोली, हार्मोनी पब्लिक स्कूल खारघर, सेंट टीएवोई स्कूल नवीन पनवेल, एमव्हीएम हायस्कूल कामोठे, बार्न्स हिंदी माध्यमिक स्कूल पनवेल, हुद्दार इंग्लिश स्कूल कोलाखे, रामकृष्ण अ‍ॅकॅडमी हरिग्राम, सेंट जॉर्ज स्कूलचा समावेश आहे.

Web Title: Girlfriend in Navi Mumbai again tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.